High Blood Sugar: तुमचंपण ब्लड शुगर सामान्य पातळीपेक्षा जास्त आहे? डॉक्टर सांगतात लगेच हे उपाय करायला

How To Control High Blood Pressure: तुमचं ब्लड शुगर ३७० mg/dL पेक्षा जास्त आहे का? डॉक्टर सांगतात अशा वेळी तातडीने कोणते उपाय करावेत.
How To Control High Blood Sugar
How To Control High Blood Sugarsakal
Updated on

Tips To Control High Blood Pressure: अनेक दीर्घकालीन आजरांपैकी सर्वात सामान्य आजार म्हणजे डायबिटीज. एकदा रक्तातील साखर वाढायला लागली की नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. योग्य ते औषधोपचार जरी नियमितपणे घेतले तरी तेवढेच पुरेसे नसते. दैनंदिन जीवनात शिस्त असणे, सकस आहार घेणे, साखरविरहित आहार घेणे आणि रोज थोडा तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. पण याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणेज अधून मधून ब्लड शुगर चेक करणे. या छोट्या गोष्टी रोज केल्या तर रक्तातील साखर नियंत्रण ठेवता येते.

पण साखर खूपच वाढली, म्हणेजच ३७० mg/dL किंवा त्याहून जास्त असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते. अशावेळी होणार त्रास दुर्लक्षित करू नये. डॉक्टर सांगतात की रक्तातील साखर एवढी वाढली तर शरीरात केटोन नावाचा विषारी घटक तयार होऊ शकतो. ज्यामुळे अचानक चक्कर येणे, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे श्वास घेण्यास त्रास होणे याची शक्यता असते.

म्हणूनच डायबेटीस असणाऱ्यांनी अगदी छोटी गोष्टही गांभीर्याने घ्यायला हवी आणि वेळीच काळजी घेतली पाहिजे.

How To Control High Blood Sugar
Diabetes Management During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान मधुमेह कसा हाताळावा? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

डॉक्टर सांगतात...

जर तुमचे ब्लड शुगर २५० mg/dL पेक्षा जास्त असेल, तर ते चिंतेचे लक्षण आहे. आणि जर साखरेची पातळी ३०० mg/dL च्या पुढे गेली, तर तब्येतीवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉक्टर सांगतात की अशा वेळेस स्ट्रोक (मेंदूत रक्तपुरवठा अचानक बंद होणे) किंवा डायबेटिक केटोअसिडोसिस (DKA) नावाची गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते.

शरिरावर होणारे परिणाम

उच्च रक्तसाखरेचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो –

  • डोळे: दृष्टिदोष किंवा अंधत्व

  • मूत्रपिंड: हळूहळू काम करण्याची क्षमता कमी होते

  • हृदय: लवकर अटॅक येण्याची शक्यता

  • रक्तवाहिन्या: संपूर्ण शरीरात नुकसान

साखर वाढण्याची कारणे

तज्ज्ञांच्या मते, खालील कारणांमुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते –

  • जास्त तणाव

  • औषधं वेळेवर न घेणं

  • शरीरात इन्फेक्शन

  • चुकीचं खाणं

  • जीवनशैलीतील असंतुलन

अशा वेळी काय कराल?

  • भरपूर पाणी प्या – त्यामुळे साखर बाहेर टाकायला मदत होते

  • Ketone टेस्ट करा – युरिन चाचणीने

  • केटोन सापडल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

  • इन्सुलिन घेत असाल, तर तुमच्या डॉक्टरांनी दिलेली आपत्कालीन योजना पाळा

  • साखर असलेले पेय टाळा, पण शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका:

  • ३७० mg/dL पेक्षा जास्त ब्लड शुगर असूनही कमी न होणं

  • अतोनात तहान लागणं

  • वारंवार लघवी होणं

  • दृष्टिदोष

  • पोटात तीव्र दुखणं

  • थकवा, अशक्तपणा, उलट्या – ही सर्व DKA ची लक्षणं असू शकतात

जीवनशैली बदलाचं महत्व

औषधं ही महत्त्वाची असली तरी, रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, आणि नियमित तपासणी ही तितकीच गरजेची आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com