Myths About Fat Women: वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये Infertility च्या समस्या अधिक; समज की गैरसमज? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Myths About Fat Women

Myths About Fat Women: वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये Infertility च्या समस्या अधिक; समज की गैरसमज?

IVF myths and facts: बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली बऱ्याच समस्या दिसून आल्या आहेत. यातील एक गंभीर समस्या म्हणजे महिलांमध्ये नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होणे. पण सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्या जोरावर आयव्हीइफ तंत्रज्ञान अशा महिलांसाठी वरदान ठरते. अश्या महिला ज्यांना आई व्हायचंय पण होऊ शकत नाही. मात्र जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये हे तंत्रज्ञान फेल ठरते असा समज आहे. हा समज की गैरसमज जाणून घेऊया.

आयव्हीएफ बाबतीत बरेच समज गैरसमज आहेत त्याविषयीच आज जाणून घेऊया.

१) पहिला गैरसमज म्हणजे आईवीएफ उपचार इन्फर्टिलिटी संबंधात सर्व समस्या दूर करते आणि या उपचारात गर्भधारणेचे प्रमाण 100 टक्के असतं.

मात्र हे खरं तर चूक आहे. आयव्हीएफ उपचारांमध्ये नेहमीच यश मिळेल असं नाही बऱ्याचदा दाम्पत्याचा राहणीमान आरोग्य यावर अवलंबून असत त्यानुसार अपयशसुद्धा येऊ शकत.

२) दुसरा आणि सर्वात मोठा गैरसमज वजनाने जास्त असलेल्या व्यक्ती IVF उपचारांमध्ये अपयशी होतात.

मात्र असे काहीही नसून तुमच्या शरीराच्या ठेवणीवरसुद्धा बऱ्याचदा हे उपचार अवलंबून असतात पण जर तुमचं राहणीमान आरोग्य चांगलं असेल तुम्ही हेल्दी असाल तर, वजन जास्त असूनही तुम्ही गर्भधारणा करू शकता. (Health)

३) तिसरा गैरसमज म्हणजे IVF द्वारे जन्म झालेल्या बालकांमध्ये जन्मत:च विकृती असते.

मात्र हेही साफ खोटं आहे. IVF द्वारे जम्म झालेल्या बालकांमध्ये विकृती असते असं काहीही नसतं. सामान्य गर्भधारणेत जन्मलेल्या बाळाप्रमाणेच IVFने जन्मलेलं बाळ असतं.

हेही वाचा: Male Infertility : पुरुषांनो, या वाईट सवयी आताच सोडा, नाहीतर...

४) चौथा गैरसमज म्हणजे रुग्णाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं, आयव्हीएफ नंतर बेड रेस्ट खूप महत्वाचं आहे.तुम्ही फार हालचाल करू शकत नाही .

मात्र असे काहीही नसून आईवीएफ उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून राहण्याची काहीही गरज नसते, केवळ अंडी रिलीज करण्यासाठी हॉस्पिटललाल महिलेला जावं लागतं पूर्ण बेड रेस्ट केल्याशिवाय तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन जास्त असलेल्या महिलांमध्ये नैसर्गिक गर्भधारणेचे प्रमाण कमी होते असे मानतात. मात्र बदलती जीवनशैली, स्ट्रेस या सगळ्यांचा परिणाम महिलांवर होऊन त्यांचा फर्टिलीटी रेट कमी होऊ शकतो. त्यासाठी वजन जास्त असलेल्या महिलांना गृहित धरता येणार नाही.