Jaggery Benefits : गुळासोबत तीळ की शेंगदाणे; काय खाणे जास्त चांगले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaggery Benefits

Jaggery Benefits : गुळासोबत तीळ की शेंगदाणे; काय खाणे जास्त चांगले?

Jaggery Benefits : महागडे व्हिटॅमिन, कॅल्शियम आणि हाडांची झिज करणाऱ्या गोळ्या खाऊन हाड ठिसूळ करण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होणार याचा विचार आपण कधीच करत नाही.

सध्या मकरसंक्रांतीमुळे सगळीकडे तिळ गुळ आवडीने खाल्ला जात आहे. खरं तर गूळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो. जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळ गुळ पण तुम्हाला माहिती आहे का गुळासोबत काय खाणे अधिक चांगले? आज आपण या विषयीचा जाणून घेणार आहे. (Jaggery with til or peanuts Benefits better for health read story)

  • गूळ + खोबरे हे बुद्धीवर्धक असतं याशिवाय हा बाप्पांचा खास नैवेद्य असतो.

  • गूळ + शेंगदाणे हे शक्तिवर्धक असतं. हा श्री हनुमानाचा खास नैवेद्य आहे.

  • गूळ + फुटाणे हे हिमोग्लोबींन वर्धक व रक्तशुद्ध करण्यासाठी फायदेशीर आहे. हाश्री बालाजीचा प्रसाद आहे.

हेही वाचा: Til Gul Ladoo : तिळगुळाचे लाडू खा अन् हिवाळ्यात हेल्दी रहा

  • याशिवाय तीळ + गूळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न, झिंक, सेलेनियम शरीराला पुरवतं. हृदयासाठी सुद्धा हे फायदेशीर असून थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी असतं. म्हणूनच संक्रांतीला गूळ पोळी आवडीने खाल्ली जाते.

  • थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरीसुद्धा अधिक फायदेशीर असते. यामुळे शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण होते.

  • डिंकाचे लाडु किंवा राजगिरा लाडू गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे यामुळेही ताकद मिळते.

    - डॉ अमित भोरकर

    ( न्युट्रीशिनिस्ट )

टॅग्स :Peanutsjaggery