esakal | कोरोनात टायफॉइडची टेस्टही येते पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनात टायफॉइडची टेस्टही येते पॉझिटिव्ह

कोरोनात टायफॉइडची टेस्टही येते पॉझिटिव्ह

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव : कोरोनात (corona) टायफॉइडची (Typhoid) चाचणी (test) देखील पॉझिटिव्ह ( positive) येत असल्याचे समोर आले आहे. त्यावरील उपचारात वेळ खर्ची होत असल्याने त्यातून रुग्ण गंभीर (patient serious) झाल्यानंतर मग दाखल होत असल्याचे धक्कादायक प्रकारही समोर येत आहेत. कोणत्याही स्वरूपाचा ताप हा कोरोना असू शकतो, असे समजून उपचार (Treatment) होणे आवश्यक असल्यचे मत व्यक्त होत आहे.

(corona sickness typhoid test positive patient serious)

हेही वाचा: कडक ‘क्रॅकडाऊन’साठी अप्पर पोलिस अधिक्षक रस्त्यावर; चौकाचौकात पोलिस

फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तीव्रतेने सुरू झाली. मार्च व एप्रिलमध्ये रुग्णांना बेड मिळत नव्हते, अशी स्थिती निर्माण होऊन दररोजच्या बळींचा आकडही वाढत गेला. रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असताना कोविड कक्षात दाखल न होता घरीच जनरल प्रॅक्टिश्‍नर डॉक्टरकडून उपचार घेण्याचे प्रकारही या दिवसांत बऱ्यापैकी वाढले.


टायफॉइडवर उपचार
गेल्या दीड-दोन महिन्यांतील या केसेसचा अभ्यास केला असता कोरोनात टायफॉइडची (विडाल) टेस्टही पॉझिटिव्ह येऊ शकते, असे अनेक केसेसवरून समोर आले आहे. बऱ्याच डॉक्टरांनी अशा रुग्णांवर टायफॉइड डोळ्यासमोर ठेवून उपचार केले. अद्यापही तसेच प्रकार सुरू आहेत. यामुळे उपचारांमध्ये वेळ जाऊन प्रत्यक्ष कोरोनावरील उपचार सुरू होत नाही आणि रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी व नंतर त्यावरील उपचार सुरू होतात.


रुग्ण गंभीर होण्याचे कारण
गेल्या काही दिवसांत, विशेषत: ग्रामीण भागात असे प्रकार मोठ्या संख्येने समोर आले. त्यातून रुग्ण गंभीर होऊन मग कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होत असून, त्यामुळेच या दुसऱ्या लाटेत मृत्युदर वाढण्यामागे हे कारण मानले जात आहे.


दोन्ही टेस्ट पॉझिटिव्ह
काही रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी केलेल्या रक्ताच्या चाचण्यांत टायफॉइडची विडाल टेस्ट केली, तर तीदेखील पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: आता एका नोटमध्ये केवळ एकच लिटर; पेट्रोल शंभरी पार

कोरोनाबाधितांची टायफॉइड टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. फॉल्स पॉझिटिव्हचा हा प्रकार असू शकतो. त्यामुळे ताप आला की त्या वेळी प्रथम कोरोनाची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी व ती निगेटिव्ह आली तर आरटीपीसीआर चाचणी करून घेणे गरजेचे आहे. आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी अन्य निदानाकडे वळावे.
-डॉ. राधेश्‍याम चौधरी,
सचिव, आयएमए, जळगाव


सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही स्वरूपाचा ताप, सर्दी-खोकला हा कोरोना समजूनच डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करावेत. अशा प्रकारची कोणतीही लक्षणे दिसल्याचस आधी कोरोना आहे की नाही, याची खात्री केल्यानंतर अन्य आजारांच्या निदानासाठी टेस्टिंगचे निर्देश रुग्णांना द्यावेत.
-डॉ. जयप्रकाश रामानंद,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

loading image
go to top