आता एका नोटमध्ये केवळ एकच लिटर; पेट्रोल शंभरी पार

आता एका नोटमध्ये केवळ एकच लिटर; पेट्रोल शंभरी पार
petrol prices
petrol pricespetrol prices

जळगाव : मागील पाच- सहा महिन्यांपासून पेट्रोलचे दर (Petorl price) सातत्‍याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol disel) भावात पुन्हा एकदा वाढ होऊन पेट्रोल भाव १०० रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. या भाववाढीने एक लिटर पेट्रोलकरीता १००.१० रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलचे भाव देखील ९० रुपयांच्या पुढे जाऊन ते रुपये ९०.२० प्रति लिटर झाले आहे. (jalgaon news petrol price one liter hundred rupees cross)

दोन- तीन वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज बदल होत आहेत. परंतु, नव्वदी पार गेलेल्‍या पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे जाणार हे सर्वश्रुत होते. नोव्हेंबरपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत राहिली. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाव वाढत गेले. १ जानेवारी ते १६ मे यादरम्यान पेट्रोलचे भाव तब्‍बल साडेआठ रूपयांनी तर डिझेलचे दर ९.७९ रुपये प्रति लिटर लिटरने वाढले.

petrol prices
फैजपूरच्या आकाशची भरारी, 13,500 फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'

अखेर गाठली शंभरी

वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोल ९१.५८ रुपये तर डिझेल ८०.९० प्रतिलिटर होते. त्यानंतर १ फेब्रुवारीला पेट्रोल ९४.०६ रुपये, १ मार्चला ९८.६१ रुपये राहिले. ही दरवाढ कायम राहत अखेर मे महिन्याच्या मध्यांतरात म्‍हणजे १६ मे रोजी पेट्रोलचे दर त्यासोबतच मे महिन्यात देखील पेट्रोल- डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली. पेट्रोल आठवडाभरात ११ मेपर्यंत ९९.३५ प्रति लिटरवर पोहोचले. तेव्हापासून ही वाढ होत पेट्रोलने अखेर शंभर रुपयांचा आकडा पार करीत १००.१० रुपये प्रति लिटरवर ते पोहचले.

जळगावच्या बाहेर शंभरच्या खाली

जळगाव शहरात पेट्रोलचे दर शंभरच्या वर पोहचले आहेत. मात्र जळगाव शहरा बाहेर म्‍हणजे हायवे लगत असलेले पेट्रोल पंप आणि इतर शहरांमध्ये देखील पेट्रोलच दर ९९.५० च्या दरम्‍यान आहेत. परंतु, या दरात देखील वाढ होवून ते शंभरीच्या वर जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com