

What is true meditation according to yoga philosophy and why it is more than stress relief
Sakal
देवयानी एम., लाइफस्टाइल कोच
काही महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राचा मला फोन आला आणि तो म्हणाला ‘तुला काहीतरी सांगायचंय, आज ध्यानात मला तू दिसलीस’. आजकाल ‘ध्यान’ हा शब्द प्रत्येकाच्या परिचयाचा झाला आहे; पण डोळे बंद करून पहिल्यांदा हत्तीला हात लावला तर जिथे हाताचा स्पर्श होईल तो हत्ती आहे असं वाटतं - पूर्ण हत्ती काय आहे हे समजत नाही. तसंच ध्यानाचं झालं आहे. ध्यानासंबंधी अनेक समज-गैरसमज लोकांमध्ये आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे त्याविषयी सखोल अभ्यास न करता वरवर आणि पटकन हवी असलेली ध्यानाची रेसिपी. अशाने ना ध्यानाचे फायदे मिळतील, ना ध्यान केल्याचा किंवा लागल्याचा आनंद.
गेल्या काही वर्षांत ध्यानाभोवती अब्जावधींची उद्योगव्यवस्था उभी राहिली आहे. अनेक ॲप्स आणि प्लॅटफॉर्म्स ध्यानाला ‘१० मिनिटांत ताणमुक्ती’, ‘२१ दिवसांत आयुष्य बदला’ अशा पद्धतीने विकताना दिसतात. ध्यान हे ‘विकत घेण्यासारखे’ कौशल्य नाही; ती संयम, शिस्त, आत्मनिरीक्षण आणि सातत्याने विकसित होणारी साधना आहे. एखादे ॲप मार्गदर्शक ठरू शकते, परंतु ते गुरू, जीवनशैली आणि अंतर्मुख साधनेची जागा घेऊ शकत नाही.