

Minimally Invasive Heart Surgery Saves Three Lives
sakal
Minimally Invasive Heart Surgery Saves Three Lives at J.J. Hospital: जे. जे. रुग्णालयाने हृदयविकार उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. रुग्णालयात मिनिमली इन्वेसिव्ह कार्डियक सर्जरी (एमआयसीएस) या अत्याधुनिक तंत्राद्वारे हृदय वाल्व प्रत्यारोपण आणि कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट (सीएबीजी) शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या तंत्रात छातीवर मोठा चिरा देण्याची गरज नसते; छोट्या चिऱ्यातूनच शस्त्रक्रिया पार पडत असल्याने रुग्णांना कमी वेदना, उत्तम सौंदर्यदृष्ट्या परिणाम आणि अल्प कालावधीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतो.