back pain hair falling
sakal
माझे वय ४५ वर्षे आहे. माझा भरपूर प्रवास होतो, त्यामुळे गेले काही महिने माझी पाठ सतत दुखते आहे. जरा काही काम केले की पाठीचा कणा एकदम ताठ होतो व नंतर उठा-बसायलासुद्धा त्रास होतो. कृपया उपाय सुचवावा.
- किरण साळवी, भोर
उत्तर – वयापरत्वे व जास्त प्रवासाने पाठ दुखणे क्रमप्राप्त असते. प्रवास करणाऱ्यांनी वातशमनासाठी पहिल्यापासून उपाय करणे आवश्यक असते. रात्रीची झोप वेळेत व पुरेशी घेणे आवश्यक आहे. रात्री झोपताना पाठीच्या कण्यावर खालून वर या दिशेत हलक्या हाताने संतुलन कुंडलिनी सिद्ध तेलासारखे तेल नक्की लावावे, तसेच रोज न चुकता संतुलन वातबलसारख्या गोळ्या, तुपात मिसळून संतुलन प्रशांत चूर्ण घेण्याचा उपयोग होऊ शकेल. संतुलनचे मॅरोसॅन रसायन व कॅल्सिसॅन गोळ्यासुद्धा नियमित घ्याव्या. साजूक तूप, लोणी, खारकेची पूड घालून सिद्ध केलेले दूध, डिंकाचा लाडू वगैरेंचा आहारात समावेश असावा. संतुलन पंचकर्म करून पाठीच्या कण्याला ताकद येण्यासाठी बस्तीबरोबर अन्य विशेष थेरपी करून घेण्याचा उपयोग होऊ शकेल.