
KBC Kid Controversy Video Viral| Kaushal Inamdar and Wife's Opinion
sakal
Kaushal Inamdar React on KBC Kid Controversy Video: अमिताभ बच्चन यांचा, सगळ्यांच्या आवडीचा शो कौन बनेगा करोडपती सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे. या शोच्या एका एपिसोडमध्ये इशित भट हा एक १० वर्षांचा मुलगा अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धटपणे बोलला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या वर्तणूकीवर रागाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून इशितच्या पालकांच्या पालकत्वावर प्रश्न उपस्थित केला आहे.
अनेक कलाकार, तज्ज्ञ मंडळींनी देखील वेगवेगळ्या सोशल मीडियावर साइटवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गायक, संगीतकार कौशल इनामदार यांनी देखील त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांच्या पत्नी सुचित्रा इनामदार, ज्या मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी सांगितलेलं निरिक्षण सांगितलं आहे.