तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे? चुकूनही हे पदार्थ खाऊ नका |Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Acidity

तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे? चुकूनही हे पदार्थ खाऊ नका

अनियमित जेवण हे ॲसिडिटीचं (Acidity) मुख्य कारण आहे. होतात. ॲसिडिटीमुळे डोकेदुखी, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या निर्माण होतात.

ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना काही गोष्टी टाळाव्या खाण्यापिण्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्याशी निगडित असतो. आपण खाण्यापिण्यात खूप काळजी घेतली पाहिजे, कारण याचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांना काही गोष्टी टाळाव्या.

हेही वाचा: World Malaria Day 2022: मलेरियामध्ये उपयुक्त ठरतील हे 5 घरगुती उपाय

१. राजमा चावल

राजमा चावल हे असे कॉम्बिनेशन आहे की लोकांना अनेकदा जेवणात खायला आवडते. पण जर तुम्हाला नेहमी ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही राजमाचे सेवन करू नये. राजमाचे जास्त सेवन आपल्या पचनसंस्थेसाठी हानिकारक असू शकते.

२. चणे

राजमाप्रमाणे छोलेचे सेवन करू नये. राजमाप्रमाणेच चण्यामुळे ॲसिडिटी होण्याचा धोका जास्त असतो. .

हेही वाचा: उन्हाच्या तडाख्यात कोल्ड्रिंकपेक्षा ताकच भारी

३. मुळा

मुळा सहसा हिवाळ्यात मिळतो पण आता तो प्रत्येक ऋतूत असतो. जर तुम्हाला ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही मुळांपासून दूर राहावे. मुळ्याच्या सेवनाने आपल्या पोटात गॅस निर्माण होतो, त्यामुळे ॲसिडिटी झाल्यास मुळ्याचे सेवन करू नये.

४. फणस

जॅकफ्रूट अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. कुठे त्याची भाजी बनवली जाते तर कुठे लोणच्यात वापरली जाते. जॅकफ्रूट हे शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराची मेजवाणी असल्याचे म्हटले जाते. जरी फणसात भरपूर पोषक तत्वे असतात पण त्यामुळे पोटात गॅसही वाढतो. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी फणसाचे सेवन करू नये.

हेही वाचा: कॅन्सरग्रस्त मित्राच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठीच...

५. अळू

अळूची भाजी आपण खुप आवडीने खातो. मात्र ही भाजी देखील समस्या वाढवू शकते ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास ॲसिडिटी होऊ शकते. मात्र, ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांनी त्याचे सेवन टाळावे.

Web Title: Keep Distance From These Things If You Have Acidity Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top