Keto Diet Plan : वेट लॉससाठी किटो डाएटचा विचार करताहेत? जाणून घ्या, कसं करावं? | Keto Diet is Best for Weight Loss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keto Diet Plan

Keto Diet Plan: वेट लॉससाठी किटो डाएटचा विचार करताहेत? जाणून घ्या, कसं करावं?

Keto Diet Plan : हल्ली बदलत्या लाईफस्टाईलनुसार वजन वाढीच्या समस्या भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण वजन कसं कमी करायचं याचा विचार करताहेत? यात किटो डाएटला तुम्ही बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्हीही पाहू शकता.

तुम्हाला माहिती आहे का किटो डाएट म्हणजे काय आणि किटो डाएट कसं करावं? त्याचे फायदे आणि बरंच काही आज आपण जाणून घेणार आहोत. (Keto Diet is best for weight loss read how to do it )

किटो डाएट म्हणजे काय?

किटो डाएटला किटोजेनिक डाएट म्हणतात. या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते तर प्रोटीन्सचे प्रमाण अधिक असते.

किटो आहार मॅक्रो

किटो आहारात फॅट, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्सचे ठराविक टक्के विभागले गेलेत. फॅट 70 टक्के असावे तर प्रोटीन्स 25 टक्के असावे. याशिवाय कार्बोहायड्रेटचे प्रमाण 5 टक्के असावे. जर तुम्ही किटो डाएट फॉलो करत असाल तर तुमचे वजन झटक्यात कमी होते.

किटो डाएट कसे फॉलो करावे?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर किटो डाएट बेस्ट ऑप्शन आहे. पण किटो डाएट फॉलो करताना विशेष काळजी घेणे गरजेची असते.

किटो डाएट फाॅलो करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट किंवा फिटनेस ट्रेनर यांचा सल्ला घेऊ शकता. याशिवाय हे डायट फाॅलो करू नये.

किटो डाएट फक्त वेट लॉससाठीच नाही तर कोलेस्ट्रॉल लेव्हेल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, एनर्जीसाठी , ब्लड शुगर कमी करण्यासाठी मदत करते.