

The article presents Ayurvedic perspectives on kidney care and emphasizes preventive health measures alongside appropriate medical consultation.
Sakal
प्राणी म्हटले की पाठोपाठ येते पाणी आणि प्राणी असेल तेथे येते पाणी व प्राण. पाणी व प्राण या दोन गोष्टी मनुष्यमात्रासाठी खूप महत्त्वाच्या असतात. पाऊस कमी झाला, दुष्काळ पडला की पाण्याची होते टंचाई. पृथ्वीच्या पोटात जसजसे खाली जावे तसतसे मिळणारे पाणी अधिक क्षारयुक्त असण्याचा संभव अधिक असतो. तसेच ते पाणी काढण्यासाठी खर्चही खूप होतो आणि एवढा खटाटोप करून शेवटी तोंड आंबटच होते. मचूळ पाणी पिऊन दुसरे काय होणार?