Milk Shelf Life : फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही दूध का नासतं? शास्त्रज्ञांनी उघड केलं रहस्य

दूध खराब होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवणे पुरेसे नाही.
milk
milksakal

दूध खराब होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवणे पुरेसे नाही. ते योग्य ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे. असे केल्याने ते दीर्घकाळ सुरक्षित ठेवता येते. तज्ञांची एक टीम म्हणते की, दूध जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी लोक ते सहसा फ्रिजच्या दरवाजात ठेवतात, पण हे योग्य ठिकाण नाही. असे केल्याने आपण दुधाचे शेल्फ लाइफ कमी होतं असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला दूध नासण्यापासून वाचवायचे असेल तर ते फ्रीजच्या मुख्य भागात ठेवा. दरवाजाच्या भागात नाही, कारण तो फ्रीजचा सर्वात कमी थंड भाग आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या फूड पॉलिसीचे रीडर डॉ ख्रिश्चन रेनॉड्स म्हणतात, दूध ही नाशवंत गोष्ट आहे. म्हणूनच फ्रीजच्या कोणत्या भागात ते साठवायचे आणि तेथील तापमान किती आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे.

milk
Health Tips: वेट लॉसपासून ते उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यापर्यंत उपयुक्त ठरतो गूळ, रात्री खाण्याचे फायदे

या संशोधन प्रकल्पाशी संबंधित डॉ. रेनॉल्ड्स म्हणतात, आमच्याकडे हाउसहोल्‍ड स्‍टीमुलेश मॉडेल आहे जे गेल्या 6 वर्षांपासून लोक दूध कसे वापरतात यावर लक्ष ठेवत आहेत. ते म्हणतात, फ्रीजचे तापमान 0 ते 5 अंश सेंटीग्रेड असते. अशा तापमानात अशा गोष्टी सुरक्षित ठेवता येतात. तापमान 5 अंशांच्या खाली राहिल्यास दुधाचे आयुष्य आणखी एक दिवस वाढू शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीज आणि दूध यासारख्या गोष्टी जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी दरवाजाच्या आत ठेवू नका जेणेकरून ते किमान तापमान मिळेल आणि खराब होणार नाही.

milk
Protein Source : प्युअर व्हेजिटेरियन्ससाठी प्रोटीनचा उत्तम सोर्स ठरतील या 6 भाज्या

शिवाय हा नियम केवळ दुधाबाबत नाही तर इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी देखील आहे. चीज, दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ फ्रीजच्या आतील भागात साठवून ठेवावेत, परंतु सहसा असे होत नाही कारण पॅकेटवरील एक्स्पायरी डेटपर्यंत दूध तापवलं जात नाही, ते फ्रीजमध्येच ठेवलं जातं. अशा स्थितीत त्यांना हवं तेवढ तापमान मिळत नाही. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही दूध खराब होण्याचा धोका असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com