Nail Biting Side Effects : तुम्हालाही नखे खाण्याची सवय आहे? आरोग्यावर होऊ शकतात इतके गंभीर परिणाम - रीसर्च

नखे खाण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याची तुम्हाला कल्पना आहे का? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Nail Biting Side Effects
Nail Biting Side Effectssakal

ताणतणाव किंवा चिंताग्रस्त लोकांना आपण नखे खाताना पाहिले असेलच. पण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?  नखे चावण्याची - खाण्याची सवय फारच सामान्य आहे. 

ही सवय अधिकतर लहान मुले आणि तरूणांमध्ये पाहायला मिळते. ताणतणाव, चिंताग्रस्त किंवा विचारमग्न अवस्थेत असल्यास ही मंडळी नखे चावू लागतात. पण यामुळे तुमच्या आरोग्यास नुकसान पोहोचवू शकते. शिवाय दातांचे अधिक नुकसान होते. 

Nail Biting Side Effects
Almond Dates Ladoo Benefits मुलांना खजूर-बदामाचे लाडू खायला द्या, जाणून घ्या फायदे व रेसिपी

लोक का खातात नखे?

लोक नखे का खातात, यामागील प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. एका अभ्यासातील माहितीनुसार, नखे चावून ही लोक आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण ही काही चांगली सवय नाही आणि यामुळे तुमच्या हास्यावरही बरेच वाईट परिणाम होऊ शकतात. 

Nail Biting Side Effects
निरोगी राहण्यासाठी सदगुरू नाश्त्यामध्ये या 2 पदार्थांचा करतात समावेश, शेअर केला VIDEO

नखे खाण्याची सवय आणि तुमचे मानसिक आरोग्य

अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या माहितीनुसार, नखे खाल्ल्याने किंवा चावल्याने तुमचे दात तुटू शकतात. तसंच दातांच्या मुळांवरही दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे दातांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक असते. 

Nail Biting Side Effects
मद्यापेक्षाही बदामामुळे यकृताचं होऊ शकते मोठे नुकसान, सदगुरूंनी सांगितली सेवनाची योग्य पद्धत

रीसर्चमधील माहितीनुसार, नखे खाणाऱ्या व्यक्ती ब्रुक्सिझम (bruxism) नावाच्या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता अधिक असते. नखे खाण्याच्या सवयीमुळे डोकेदुखी, चेहऱ्याच्या भागामध्ये वेदना होणे, दातांचे आरोग्य बिघडणे यासारख्या समस्या वाढण्याच्या शक्यता असतात. 

नखे खाण्याच्या सवयीपासून मुक्तता कशी मिळवावी?

अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटॉलॉजी असोसिएशनने यासंदर्भात काही टिप्स शेअर केल्या आहेत, ज्याद्वारे आपण नखे खाण्याच्या वाईट सवयीपासून मुक्तता मिळवू शकता. 

  • नखे वाढू देऊ नका

  • नखांवर नेलपेंट लावा, जेणेकरून तुम्हाला नखे खाण्याची इच्छा होणार नाही. कारण नेलपेंटमध्ये केमिकल असते.

  • नखे खाण्याची इच्छा झाल्यास आपला मेंदू अन्य गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा आणि स्ट्रेस बॉल इत्यादी गोष्टींचा वापर करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com