
Ridge Gourd Benefits: उन्हाळ्यात डिहायड्रेशन होवू नये यासाठी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. त्याच प्रमाणे भरपूर प्रमाणात भाज्यांचा Vegetables आहारात समावेश करावा. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात.
उन्हा्यात दुधी किंवा काकडीचा आहारात Diet समावेश करणं फायद्याचं असल्याचं तुम्हाला ठाऊक असेलच. पण तुम्हाला माहितेय का आणखी एक अशी भाजी आहे. जी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. ही भाजी म्हणजेच दोडका. Know the Benefits of Dodka Luffa acutangula For good health Marathi Tips
दुधीप्रमाणेच दोडक्यामध्ये Luffa acutangula देखील पाण्याचं प्रमाण अधिक असतं. यासोबतच दोडक्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. दोडक्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस तसचं व्हिटॅमिन Vitamin ए, बी, सी तसचं मुबलक प्रमाणात ठराविक अँटीऑक्सिडंट असतात जे काही मोजक्या भाज्यांमधयेच Vegetables आढळतात.
दोडका या भाजीचं नाव घेताच अनेकजण तोंड मुरडतात. मात्र या भाजीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी वजन कमी करण्यापासून ते कॅन्सरच्या समस्या दूर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. पाहुयात दोडक्याचे आरोग्यासाठी काही फायदे.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर – वजन कमी करण्यासाठी दोडका अनेक प्रकारे मदत करू शकतो. यामुळे मोटाबोलिक रेट कमी होण्यास मदत होते ज्यामुळे शरिरातील फॅट्स कमी होतात.
शिवाय या भाजीत भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने वजन कमी कऱण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आहारात दोडक्याच्या भाजीता जास्त समावेश करावा तसचं तुम्ही दोडक्याचा ज्यूसही पिऊ शकता.
मधुमेहींसाठी गुणकारी- दोडक्याच्या सेवनामुळे सर्वप्रशम शरीरातील साखरेचं चयापचय जलद होतं तसचं मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेही रुग्णांनी आहारात दोडक्याच्या भाजीचा समावेश करणं लाभदायक ठरू शकतं.
हे देखिल वाचा-
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर गुणकारी- दोडका हे दुधी, पडवल याचं परिवारातील भाजी असल्याने याच पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. तसचं सॅल्यूलोज नावाच फायबर मुबलक प्रमाणात आढळत. त्यामुळेच ग्रेवी, डाळ किंवा भाजीच्या स्वरुपात दोडक्याचं सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
अनेकजण बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी दोडक्याच्या ज्यूसचं सेवन करतात. यासाठी एक ग्लास दोडक्याच्या ज्यूसमध्ये थोडं मध मिसळून तुम्ही सेवन करू शकता. पोटासाठी हे फायद्याचं ठरतं.
अॅनिमियावर उपचार- दोडक्याच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आढळतं. त्यामुळेच या भाजीतं नियमित सेवन केल्यास रक्ताच्या कमतरतेमुळ्या होणाऱ्या अॅनिमियावर मात करणं शक्य आहे.
तसचं दोडक्यामध्ये विटामिन बी६ मुबलक प्रमाणात आढळतं. याचा लाल रक्त कोशिका तयार करण्यासाठी फायदा होतो.
डोळ्यांची दृष्टी वाढते- दोडक्यामध्ये विटामिन ई मुबलक प्रमाणात आढळतं. बीटी-कॅरेटीनच्या रुपात ते उपलब्ध असतं.
त्यामुळे वाढत्या वयानुसार कमी होणारी दृष्टी चांगली राहण्यासाठी आणि ही दृष्टी परत मिळवण्यासाठी उपयोग होवू शकतो. यासोबतच डोळ्यांचे मॅक्युलर डिजनरेशन आणि दृष्टी कमी होणे तसचं डोळ्यांशी निगडीत इतर समस्या दूर करण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.
दोडक्याच्या भाजीत असलेलं बीटा-कॅरेटीन हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट असून ते डोळ्यातूल धमन्या आणि रक्तवाहिन्यांमझील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. तसचं डोळ्यांचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतं.
यकृतासाठी फायदेशीर- दोडक्याच्या भाजीमध्ये शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे गुणधर्म आढळतात. हे आपल्या यकृतातून विषारी पदार्थ तसचं धोकादाक रसायनं.
न पचलेले अन्नाचे कण काढून टाकण्यास मदत करतं. दोडक्यातील तत्वांमुळे यकृतामध्ये पित्तरस तयार होण्यास आणि त्याद्वारे प्रथिनांचं पचन होण्यास मदत होते. काविळीच्या रुग्णांना आराम मिळण्यासाठी आयुर्वेदामध्ये दोडक्याचा वापर उपयुक्त असल्याचं म्हटलं गेलं आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते- दाडक्याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या भाजीतील विटामिन सी, आयरन, मॅग्नेशियम, थियामिन, रिबोफ्लेविन अणि झिंक ही तत्व इम्यूनिटी मजबूत बनवण्यास मदत करतात.
त्वचेसाठी फायदेशीर- दोडक्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तसचं यातील तत्वांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. परिणामी चेहऱ्यालर मुरुम आणि पुटकुळ्या येण्याचं प्रमाण कमी होतं. तसचं नेस्तेज त्वचेवर पुन्हा चमक येते.
डोकेदुखीवर उपायकारक- दोडक्याच्या भाजीत एनाल्जेसिक आणि अंटीइंफ्लामेटरी गुण आढळतात. हे दोन्ही गुण दुखणं किंवा वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे डोकेदुखीची समस्या असलेल्यांनी या भाजीचा आहारात समावेश करावा.
अशा प्रकारे दोडक्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.