‘या’ वेळी चटपटीत स्नॅक्स खाल तर आरोग्य येईल धोक्यात, भूकेसाठी हे आहेत Healthy Snacks पर्याय

अनेकदा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खाणं अनेकजण पसंत करतात. मग ते फरसाण, चिवडा असो किंवा चिप्स. मात्र जरी तुमची ही स्नॅक्स खाण्याची वेळ संध्याकाळी ६ नंतर असेल तर आजच तुमची ही सवय बदला.
स्नॅक्स नक्की कधी खावेत
स्नॅक्स नक्की कधी खावेतEsakal

स्नॅक्स हा अनेकांच्या दिवसभराच्या आहारातील अत्यंत महत्वाचा घटक बनत चालला आहे. केवळ संध्याकाळीच नव्हे तर सकाळी, दुपारी अगदी रात्री उशीरा सतत काही तरी चटपटीत खाण्याची अनेकांना आवड असते. Know the right time to eat snacks to avoid bad effects on health

तर काहीजण संपूर्ण पौष्टिक आहाराऐवजी Healthy Diet संपूर्ण दिवस काहीना काही स्नॅक्सचे Snacks पदार्थ खावूनच घालवतात. मात्र कोणत्याही वेळी स्नॅक्स खाण्याच्या या सवयी तुम्हाला महागात पडू शकतात.

स्नॅक्समध्ये अनेकजण खास करून चिप्स, पॉपकॉर्न किंवा अगदी चहा आणि काही सॉल्टेट बिस्किटही Biscuits खाणं पसंत करतात. तर अनेकजण बाहेरचे पदार्थ खाण्याएवजी घरगुती स्नॅक्सचे पदार्थ हेल्दी असा विचार करून फरसाण, लाडू किंवा होममेड शेव, खाऱ्या शंकरपाळ्या किंवा मटरी असे घरगुती पदार्थ खाणं पसंत करतात. मात्र घरगुती स्नॅक्सचे Home Made Snacks पदार्थ जरी तुम्ही चुकीच्या वेळी खात असाल तर त्याचा आरोग्यावर नक्कीच दुष्परिणाम होवू शकतो.

या वेळी खावू नये स्नॅक्सचे पदार्थ

अनेकदा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खाणं अनेकजण पसंत करतात. मग ते फरसाण, चिवडा असो किंवा चिप्स. मात्र जरी तुमची ही स्नॅक्स खाण्याची वेळ संध्याकाळी ६ नंतर असेल तर आजच तुमची ही सवय बदला.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी ६ वाजल्यानंतर कोणतेही स्नॅक्स खाणं खासकरून तळलेले आणि प्रिझर्व्हेटिव्ह असलेले स्नॅक्स खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. संध्याकाळी सुर्यास्तानंतर आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे असे पदार्थ पचवणं कठिण होतं. याचा पचनक्रियेवर परिणाम होतो.

संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तसचं खासकरून रात्री उशीरा अनेकजण टीव्ही पाहताना किंवा सोशल मीडियावर सर्फिंग करताना चटपटीत स्नॅक्स खाणं पसंत करतात. यामुळे शरीरामध्ये फॅट्स वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता तसचं गॅस तसचं कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.

हे देखिल वाचा-

स्नॅक्स नक्की कधी खावेत
Easy Snacks Recipe : वाचलेल्या अन्नापासून बनवा Yummy & Healthy Momos, लगेच नोट करा रेसिपी

स्नॅक्स म्हणून हे पदार्थ खाणं उत्तम

असे काही पर्याय आहेत जे तुम्ही स्नॅक्स म्हणून दोन जेवणांच्या मधल्या वेळेत तसचं अगदी रात्री भूक लागल्यानंतरही खावू शकता. या हेल्दी स्नॅक्स पर्यायांमुले तुमच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. शिवाय यामुळे तुम्हाच्या शरीराला काही पोषक तत्व नक्कीच मिळतील.

१. रोस्टेड चणे- भाजलेले चणे हा स्नॅक्सचा एक उत्तम भारतीय पर्याय आहे. कॅल्शियमने परिपूर्ण असलेले चणे तुमच्या भूकेसाठी एक उत्तम पर्याय आहे. चण्यांमध्ये कॅल्शियमसोबतच झिंक, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि आयरन अशी इतरही पोषक त्तव असल्याने चण्यांचं सेवन तुम्हाला फायदेशीर ठरेल.

अगदी रात्री उशीरा देखील एखादा सिनेमा पाहताना तुम्ही एक मुठभर चणे नक्कीच खाऊ शकता. यामुळे ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत होते.

हे देखिल वाचा-

स्नॅक्स नक्की कधी खावेत
Snacks Recipe : वाफेवर शिजवून लगेचच तयार होतात हे पदार्थ,नाश्त्यासाठी आहेत परफेक्ट मेन्यू!

२. मखाना- मखानाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये अत्यंत कमी फॅट्स असून कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं. तुम्ही स्नॅक्स म्हणून भाजलेले मखाने खावू शकता.

यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. तसतं रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात राखण्यासाठी मखाना उपयुक्त ठरतात.

३. धान्यांचे मुरमुरे- मुरमुरे हा देखील स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही नाचणी, ज्वारी किंवा बाजरीचे मुरमुरे रात्री देखील भूक लागल्यावर खावू शकता. हे धान्यांचे मुरमुरे ग्लुटन फ्रि असतात. शिवाय यात मोठ्या प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम उपलब्ध असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.

४. बार्लीचे लाडू- बार्ली म्हणजेच जव किंवा सातू हे एक एक पारंपरिक धान्य असून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही स्नॅक्ससाठी जव म्हणजेच बार्लीचे लाडू बनवून ठेवू शकता. बार्लीचे अनेक औषधी फायदे आहेत. बार्ली मुळात चवीला गोड असल्याने तुम्ही यात किंचित गूळ किंवा खारिक पावडरचा वापर करून लाडू तयार करू शकता.

भूकेच्या वेळी चिप्स किंवा इतर चॉकलेट किंवा पेस्ट्री खाण्याएवजी तुम्ही १ किंवा २ बार्लीचे लाडू खावू शकता.

याशिवाय तुम्ही दिवसा दोन जेवणांच्या मध्ये किंवा दुपारच्या जेवणानंतरही भूक लागल्यास एखादं फळ खावू शकता. रात्रीच्या वेळी अनेक फळं खाणं टाळणं योग्य. मात्र इतरवेळी कोणतही फळं हा देखील स्नॅक्ससाठी एक चांगला पर्याय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com