Snacks Craving : चहासोबत काहीतरी हटके खावंस वाटत आहे? बनवा खास साबूदाण्याचे क्रिस्पी फिंगर्स

काहीतरी खास आणि हटके खावंस वाटत असतं, त्यात जर ते छान मसालेदार असेल तर...
Sago-Corn Flour Crispy Fingers
Sago-Corn Flour Crispy Fingersesakal

Sago-Corn Flour Crispy Fingers : चहासोबत नेहमीच काहीतरी खास आणि हटके खावंस वाटत असतं, त्यात जर ते छान मसालेदार असेल तर काय विचारायलाच नको. पण आता काहीतरी म्हणजे काय? प्रश्न छान आहे.. पण उत्तर सापडण जरा कठीण वाटतं. अशा स्थितीत साबुदाणा कॉर्न फ्लोर क्रिस्पी फिंगर्स ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. बघूया याची रेसिपी...

साहीत्य :

- एक वाटी साबुदाणा

- दोन चमचे कॉर्नफ्लोर

- राजगिराचे पीठ अर्धी वाटी

- काळी मिरी पावडर अर्धा चमचा

- लाल तिखट अर्धा चमचा

Sago-Corn Flour Crispy Fingers
Food Tips for Summer : उन्हामुळे चिडचिड होते? मग ‘या’ पदार्थांचा करा आपल्या आहारात समावेश

- मीठ चवीनुसार

- उकडलेले दोन बटाटे

- पनीरचे लांबट तुकडे

- चाट मसाला एक चमचा

- तेल तळण्यासाठी

Sago-Corn Flour Crispy Fingers
Healthy Food : तांदुळ, रव्याची इडली खाऊन कंटाळलात? आता बनवा गाजराची पौष्टीक इडली!

कृती :

- साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर करुन तयार करा. नंतर एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढा.

- आता या साबुदाणा पिठात राजगिराचे पीठ मिक्स करा अन् सोबत उकडलेले बटाटे घाला.

- आता त्यात चाट मसाला, काळी मिरी आणि लाल तिखट, चवीनुसार मीठ एकत्र मिसळा.

- उकडलेले बटाटे चांगले मॅश करुन मिक्स करा. तुम्हाला हवं असेल तुम्ही पनीर मॅश करुन मिक्सही करु शकता. त्यामुळे चव वाढेल.

Sago-Corn Flour Crispy Fingers
Food Tips : नवऱ्याला घरंच खायची सवय लावायची असेल तर हॉटेलची ग्रेव्ही बनवा घरच्या घरी!

- आता या मिश्रणाच्या मदतीने रोल तयार करा.

- कढईत तेल गरम करुन एका प्लेटमध्ये कोरडे कॉर्न फ्लोअर पीठ ठेवा.

- फिंगर्स गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.

- टिश्यू पेपरवर काढून केचपसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com