कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार; वेळीच जाणून घ्या कारणं अन् लक्षणे | High cholesterol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High cholesterol

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकतात 'हे' गंभीर आजार; वेळीच जाणून घ्या कारणं अन् लक्षणे

Bad Cholesterol Symptoms: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःकडे दुर्लक्ष करतात. योग्य आहार न केल्यामुळे आरोग्याची समस्या देखील निर्माण होते. अनेकांना ह्रदयाशी संबंधित आजारांचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी-जास्त झाल्यावरही समस्या निर्माण होऊ शकते.

कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पातळ पदार्थ असतो, जो पेशी निरोगी ठेवणे आणि नवीन पेशीच्या निर्मितीसाठी मदत करतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे (cholesterol) प्रमाण वाढल्यास ह्रदयाशी संबंधित आजार होता. उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदय विकाराचे कारण बनते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाहात देखील अडथळा निर्माण होतो.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

कोलेस्ट्रॉल का वाढतो?

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण अनुवांशिक देखील असू शकते. सर्वसाधारणपणे ही समस्या अयोग्य जीनवशैलीमुळे निर्माण होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून तुम्ही या आजारांना सहज रोखू शकता.

कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे, हे जाणून घेण्यासाठी कोणतीही विशेष लक्षणं नसतात. परंतु, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन शरीराची तपासणी करू शकता. ब्लड टेस्टद्वारे देखील तुम्हाला कोलेस्ट्रॉलची स्थिती समजू शकते. मात्र, वारंवार मळमळल्या सारखे वाटणे, जबडा-हातामध्ये वेदना, श्वास घेण्यास समस्या आणि जास्त घाम येत असल्यास ही कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं असू शकतात.

हेही वाचा: Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करतात?

डॉक्टरांचा सल्ला घ्या

ह्रदयाशी संबंधित आजार टाळण्यासाठी डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे गरजेचे आहे. याशिवाय, तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असल्यास दरवर्षी कोलेस्ट्रॉल टेस्ट करावी. ५५ ते ६५ वयाच्या महिलांनी देखील कोलेस्ट्रॉल टेस्ट करणे फायद्याचे ठरेल. याशिवाय, कोणतीही समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसेच, कोणताही आजार टाळण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम फायद्याचा ठरेल.

(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

हेही वाचा: Health Tips: सकाळचा नाश्ता टाळल्यास  तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात त्याचे असंख्य दुष्परिणाम...