
Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करतात?
Divase: दिवशे ही हिवाळ्यात केली जाणारी एक पारंपरिक रेसिपी आहे. खास करून कोकणात नाचणी,ज्वारी, बाजरी या धान्याचे पिठ एकत्र करून ही पौष्टिक दिवशे तयार केले जातात. दिवशे हे बाळातपणात देखील महिलेला खायला दिले जातात.
1) नाचणीमध्ये (ragi in marathi) लोहाचा चांगला स्रोत आहे. अनिमिया आणि हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या रूग्णांना आपल्या आहाराच नाचणीचा समावेश करून घेणे फायद्याचे ठरते. हे एखाद्या घरगुती उपचाराप्रमाणेच आहे. नाचणी खाल्ल्याने शरीरात विटामिन सी ची कमतरता जाणवत नाही आणि शरीरातील रक्तामध्ये लोहाचे प्रमाणही वाढते.
2) बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्याने बीपी (BP)आणि हृदयाच्या (Heart)समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरी खाण्याचा सल्ला देतात. बाजरीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.
3) वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी ज्वारी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. ज्वारी मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे आपले पोट बर्याच काळासाठी भरलेले राहते. याशिवाय यात मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
आजच्या लेखात आपण पारंपरिक पद्धतीने पौष्टिक दिवशे कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत..
साहित्य:
1) दोन वाटी निवडलेली मेथी भाजी
2) एक वाटी (नाचणी,ज्वारी, बाजरी,)मिक्स पीठ
3) एक कांदा बारीक चिरलेला
4) मिरची लसूण पेस्ट
5) तेल
6) तूप
7) हळद
8) हिंग
9) चवीनुसार मीठ
10) एक वाटी पाणी
कृती:
मिक्स पीठे थोडं मीठ टाकून कोमट पाण्यात मळून,गोळा करणेत्या गोळ्याच्या छोट्या छोट्या वाट्या करून घेणेएका पॅन मधे तेल टाकून त्यात मिरची आणि लसूण ची फोडणी करून घेणे, त्यात हिंग हळद आणि कांदा टाकून परतून घेणे. मग त्यात मेथी आणि मीठ टाकून एक वाफ येऊ देणेवाफ आल्यानंतर त्यात मिक्स पिठाच्या वाट्या अलगद ठेऊन अर्धा वाटी पाणी घालून वाफेवर शिजवणे.वाफेवर शिजल्यानंतर प्लेट मधे काढून घेऊन तूप टाकून,लोणचं आणि पापड बरोबर सर्व्ह करणे.