लातूरमध्ये तीन बालकांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur three children Open heart surgery Vivekanand Hospital

लातूरमध्ये तीन बालकांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’

लातूर - येथील विवेकानंद रुग्णालयात डॉक्टरांना नऊ बालकांवर एकाच दिवशी यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे यापैकी तीन बालकावर ओपन हर्ट सर्जरी करण्यात आली आहे. नऊपैकी सातजणावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

विवेकानंद रुग्णालयात एकाच छताखाली सर्व प्रकारचे अद्ययावत उपचार उपलब्ध आहेत. त्यात हृदय शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. मुळातच हृदय शस्त्रक्रिया किचकट असते. त्यात बालकांची शस्त्रक्रिया असेल तर गुंतागुंत अधिक असते. या सर्व अडचणींवर मात करत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. या संदर्भात डॉ. नितीन येळीकर यांनी सांगितले की, एकाच दिवशी झालेल्या या नऊ शस्त्रक्रियांपैकी पैकी शस्त्रक्रिया या हृदयाच्या छिद्रासंदर्भातील होत्या. या आठपैकी तीन बालकांवर ओपन हर्ट सर्जरी करण्यात आली. उर्वरित पाच बालकांवर बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विना ऑपरेशन हृदयातील अरुंद वॉल उघडण्याची शस्त्रक्रियाही याच दिवशी करण्यात आली. ज्या बालकांवर बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांची २४ तासानंतर रुग्णालयातून सुट्टी करण्यात येते. ओपन हर्ट सर्जरी झालेल्या बालकांना मात्र ४ ते ५ दिवस शस्त्रक्रियेनंतर उपचार घ्यावे लागतात.

मुंबईतील एशियन हर्ट इन्स्टिट्यूटचे डॉ. सारंग गायकवाड, भूलतज्ज्ञ डॉ. प्रविण लोव्हाळे यांच्यासह मुंबईतील शशिकांत नेमहाळे व निहाल बिन नसीर यांनी या तीन शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. डॉ. नितीन येळीकर व हैदराबाद येथील केअर हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सहा बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व बाल हृदयरोग रुग्णांची देखभाल ही अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर तसेच डॉ. महेश सोनार यांनी केली. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे, डॉ. गोपीकिशन भराडिया, डॉ. अरुणा देवधर, डॉ ब्रिजमोहन झंवर, कार्यवाह डॉ. राधेशाम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात नऊ पैकी सात शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या.

दर महिन्याला तिसऱ्या शनिवार, रविवारी शस्त्रक्रिया

पूर्वीच्या काळी पुणे- मुंबई किंवा हैदराबाद येथे जाऊन कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया आता विवेकानंद रुग्णालयात होत आहेत. लातूरसह मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ होत आहे. विवेकानंद रुग्णालयात दर महिन्याचा तिसरा शनिवार व रविवारी अशा शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. गरजू रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. नितीन येळीकर यांनी केले आहे.

Web Title: Latur Three Children Open Heart Surgery Vivekanand Hospital Health Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..