Leptospirosis Alert: पावसाच्या पाण्यातून चाललात? लेप्टोस्पायरोसिसचा वाढता धोका; प्रतिबंधात्मक औषधं घेण्याचं पालिकेचं आवाहन

पावसाच्या पाण्यातून चालल्यानंतर लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढू शकतो; प्रतिबंधात्मक औषधे, लक्षणे आणि पालिकेच्या महत्त्वाच्या सूचनांविषयी जाणून घ्या.
Leptospirosis Alert

Leptospirosis Alert

sakal

Updated on

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असून, नागरिकांना त्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. अशा परिस्थितीत लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) संसर्गाचा घोका वाढल्याने मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

विशेषतः जखम, खरचटलेली त्वचा किंवा पायाला भेगा असलेल्या व्यक्तींनी साचलेल्या पाण्यातून अथवा चिखलातून चालल्यास संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार २४ ते ७२ तासांच्या आत प्रतिबंधात्मक औषधोपचार करून घ्यावेत, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com