Health
sakal
- डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी
जागतिक फिजिओथेरपी दिवस दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. फिजिओथेरपिस्टनी आरोग्यसेवा, कार्यक्षमता आणि पुनर्वसनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेण्याबरोबरच फिजिओथेरपीच्या शाखांबद्दल जनजागृती करणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. यावर्षीचा विषय आहे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ, म्हणजेच हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य.