

Obesity Triggering Depression in 70% Indians | Lifestyle Disorders Raise Major Health Risks
sakal
Health News in Marathi: देशातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोक त्यांच्या लठ्ठपणामुळे नैराश्येचा सामना करत आहेत. ही समस्या विशेषतः तरुणांमध्ये दिसून आली. त्यांचा बीएमआय सरासरीपेक्षा जास्त आहे, अशी माहिती १४२ स्थूल व्यक्तींच्या सर्वेक्षणातून समोर आली.
मेटाहील लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटरने केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यक्ती समाजातील नकारात्मक बोलणे मनावर घेतात. हे लोक स्वतःलाच दोष देऊ लागतात. त्यामुळे नैराश्य, चिंता, दुःख, आत्मविश्वास कमी होणे, स्वतःच्या शरीराविषयी नकारात्मक भावना, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि मानसिक आरोग्याची गुणवत्ता कमी होणे अशा गोष्टींशी त्यांचा संबंध दिसून येतो.