Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिस ठरू शकतो जीवघेणा, या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

लिव्हर सिरोसिसची लक्षणे वेळीच लक्षात घेणे महत्वाचे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.
Liver Cirrhosis
Liver Cirrhosisesakal

Liver Cirrhosis : लिव्हर सिरोसिसमध्ये, लिव्हरचा आकार हळूहळू आकुंचन पावतो. ज्यामुळे लिव्हरची लवचिकता संपते. लिव्हरच्या पेशींचे नुकसान झाल्यामुळे लिव्हरचे कार्य विस्कळीत होते. ज्यामुळे हळूहळून लिव्हरची कार्य करण्याची गती मंदावते. लिव्हर सिरोसिसमुळे कर्करोग, शरीरात साखरेची पातळी वाढणे यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. तेव्हा लिव्हर सिरोसिसची लक्षणे वेळीच लक्षात घेणे महत्वाचे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

लिव्हर सिरोसिसची कारणे

'द लॅन्सेट' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जगात उद्भवणाऱ्या लिव्हरच्या आजारांपैकी जवळपास 57 टक्के समस्या लिव्हर सिरोसिसशी संबंधित आहेत. यापैकी सुमारे 30 टक्के हिपॅटायटीस बी, सुमारे 27 टक्के हिपॅटायटीस सी आणि 20 टक्के अति मद्यपानामुळे होतात. त्याच वेळी, सिरोसिसची सुमारे 20 टक्के कारणे आजपर्यंत अज्ञात आहेत. 3% सिरोसिस प्रकरणे ऑटोइम्यून यकृत विकार आणि विल्सन रोग यांसारख्या अनुवांशिक रोगांशी संबंधित आहेत.

लिव्हर सिरोसिसची तीन प्रमुख कारणे आहेत

1. हिपॅटायटीस बी आणि सी संसर्ग : दीर्घकाळापर्यंत निदान न झालेल्या संसर्गामुळे यकृत सिरोसिसचा धोका वाढतो. हिपॅटायटीस बी ची लस उपलब्ध आहे. हिपॅटायटीस सी साठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही, परंतु ती उपचार करण्यायोग्य आहे.

2. फॅटी लिव्हर डिसीज वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या मते, लठ्ठपणा हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजचे प्रमुख कारण आहे. यामध्ये यकृतावर चरबीचे थर जमा होतात. हे जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे होते. तेव्हा पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या. नियमित व्यायाम करा.

3. दीर्घकाळ जास्त मद्यपान केल्याने यकृत सिरोसिसचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूपासून दूर राहणे.

ही लक्षणे वेळीच ओळखा

  • रक्ताच्या उलट्या

  • भूक न लागणे

  • आतड्यांमधून रक्तस्त्राव

  • हिमोग्लोबिन कमी होणे

  • निरर्थक बोलणे

  • गिरकी घेणे

  • त्वचा आणि डोळे पिवळे होणे आणि खाज सुटणे

  • परिश्रम न करता थकवा जाणवणे

  • वजन कमी होणे

  • नाकातुन रक्तस्त्राव

  • वारंवार ताप येणे

  • विसर पडणे

Liver Cirrhosis
Mental Health Tips: कामात मन लागत नाही? सतत थकल्यासारखे वाटते? आजच सोडा या 4 वाईट सवयी

तपासणी आणि उपचार लक्षणांवर आधारित लिव्हर कार्य चाचणी, सीटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोस्कॅन आणि बायोप्सी करू शकतात. चाचणीमध्ये रक्तातील सीरम बिलीरुबिनची पातळी वाढल्याने लिव्हर कमकुवत होत असल्याचे सूचित होते. SGPT किंवा SGOT मध्ये वाढ लिव्हरच्या पेशी नष्ट होत असल्याचे सूचित करते. (Liver)

Liver Cirrhosis
Liver Detox Drink: लिव्हर स्वच्छ करण्यात ऊसाच्या रसा एवढं बेस्ट कोणीच नाही! ट्राय तर करा...

हिपॅटायटीस बी आणि सी च्या संसर्गामध्ये अशी औषधे दिली जातात, ज्यामुळे लिव्हरच्या पेशींचे नुकसान कमी होऊ शकते. ज्या रुग्णांच्या पोटात पाणी साचते, त्यांच्या लिव्हरची स्थिती अल्ट्रासाऊंड मशीनद्वारे विशेष सॉफ्टवेअरद्वारे मोजली जाते. त्यानंतरच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट उपचार करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com