Mental Health Tips: कामात मन लागत नाही? सतत थकल्यासारखे वाटते? आजच सोडा या 4 वाईट सवयी

आपल्यासोबत बऱ्याचदा असं होत की, एखाद महत्वाचं काम करताना आपलं मन वेगळ्याच दिशेनं धावत असत.
Mental Health
Mental Healthsakal

आपल्या शरीरावर मनाचे पूर्ण नियंत्रण असते. मेंदूमुळे आपण अवघड कामे सहज करू शकतो. कधीकधी आपली विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता अचानक कुठेतरी हरवते. मेंदू काम करत नाही किंवा काहीही विचार करू शकत नाही, असे तुमच्यासोबतही अनेकदा घडले असेल. असे का होते माहीत आहे का?

जीवनाशी निगडीत सर्व समस्यांमुळे मेंदू अनेक वेळा आपले काम नीट करू शकत नाही. जरी हे एकमेव कारण नाही. याशिवाय खाण्याच्या काही वाईट सवयी देखील याचे कारण असू शकतात. आज आम्ही तुम्हाला त्या वाईट सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.

Mental Health
High Pillow Side Effects: जाड उशीमुळे केवळ मानेचे त्रास होतात असे नाही, होतील हे गंभीर आजार

आजच या वाईट सवयी सोडा

1. ब्रेकफास्ट स्किप करणे: काही लोक सकाळी घाईत असतात. या घाईमुळे ते नाश्ता स्किप करतात. ब्रेकफास्ट हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. पण हे माहीत असूनही अनेकजण ते टाळण्याची मोठी चूक करतात. यामुळेच मेंदूला कमजोरी जाणवू लागते आणि तुम्ही काहीही विचार करू शकत नाही.

2. जास्त गोड खाणे: गोड पदार्थांची क्रेविंग होणे सामान्य आहे. पण जर तुम्ही गोड पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर ही चिंतेची बाब आहे. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की खूप गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरात अनेक आजार होतात आणि तुमच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

Mental Health
Kitchen Hacks: पावसाळ्यात साखर, मिठाला सुटलं पाणी; या छोट्या टीप्स नक्की करा फॉलो

3. राग येणे: राग येणे देखील मेंदूच्या कार्यात अडथळा आणते. जास्त राग आल्यावर मन नीट कार्य करू शकत नाही. जर तुम्हाला जास्त राग आला तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याशी खेळत आहात. कारण राग आल्याने मेंदूच्या नसांवर वाईट परिणाम होतो.

4. अपूर्ण झोप: ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. यामुळे आपल्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com