Liver Cleanse : लिव्हर मधला सगळा कचरा झटकन बाहेर काढून टाकतील या आयुर्वेदिक वनस्पती

Liver Cleanse Natural: लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होणे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे
Liver Cleansing Herbs - Health Tips
Liver Cleansing Herbs - Health Tipsesakal

Liver Cleansing Herbs : आपले शरीर सुरळीत राहण्यासाठी आणि एक हेल्दी आयुष्य जगण्यासाठी शरीरातले सगळे अवयव निरोगी असणे खूप गरजेचे आहेत. त्यातलाच एक महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हरमध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होणे तुमच्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

लिव्हर अन्नपचन आणि चयापचयाचे काम करते. सततचे बैठी काम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त मद्यपान किंवा कोणत्याही विषाणू संसर्गामुळ शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच यकृतालाही नुकसान होऊ शकते.

आपण जे काही खातो ते पचवण्याचे काम लिव्हर करते आणि शरीरात साचलेले टॉक्सिन्सही काढून टाकते. याचा अर्थ लिव्हरमध्ये विष आणि कचरा जमा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. लिव्हरमध्ये घाण साचल्यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

Liver Cleansing Herbs - Health Tips
Health Tips For Summer : उष्माघाताला दूर ठेवण्यासाठी औषधांवर भरमसाठ खर्च कशाला करायाचा? हे १० रूपयाचे पदार्थ खा की!

लिव्हर साफ असणे महत्वाचे का आहे?

लिव्हर फॅट्स काढून टाकते आणि पित्त तयार करुन पचन सुधारते

हे रक्त शुद्ध करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

लिव्हर शुद्ध करण्यात अयशस्वी झाल्यास लिव्हर सिरोसिस, हिपॅटायटीस, अल्कोहोलिक हेपेटायटीस आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग यांसारखे जीवघेणे रोग होऊ शकतात.

लिव्हर स्वच्छ असल्याने संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते.

Liver Cleansing Herbs - Health Tips
Health Tips : रात्रीचं जेवन टाळणं हानिकारक असते?

लिव्हर कसे स्वच्छ ठेवावे?

या औषधी वनस्पतींनी लिव्हर स्वच्छ ठेवा जेणेकरुन लिव्हर निकामी होणार नाही. लिव्हर स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी आहार घेणे आणि व्यवस्थित रुटीन फॉलो करणे.

याशिवाय, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोलचे सेवन टाळले पाहिजे. तुम्ही रोज वापरल्या जाणार्‍या काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींद्वारे देखील लिव्हर डिटॉक्स करु शकता, कसे ते जाणून घेऊया-

Liver Cleansing Herbs - Health Tips
Health Tips : हरभऱ्यांमुळं राहील Blood Sugar नियंत्रणात

भूम्यमालाकी (Bhumyamalaki)

भूम्यमालाकी ही यकृताच्या आरोग्याला चालना देण्यासाठी एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. त्याचा यकृतावर थंड आणि सुखदायक प्रभाव पडतो.

त्याचे शुद्धीकरण गुणधर्म पित्त आणि कफ शांत करण्यास मदत करतात. हे यकृत आणि पित्ताशय स्वच्छ करण्यास, विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि यकृत मजबूत करण्यास देखील मदत करते.

कुटकी (Panicum Antidotale)

ही आयुर्वेदिक जडीबुटी शरीरासाठी औषधापेक्षा कमी नाही. त्याच्या शुद्धीकरण गुणधर्मांचा यकृत आणि पित्त मूत्राशय या दोन्हींवर परिणाम होतो. हे यकृत कार्य आणि पित्त प्रवाह प्रोत्साहन देते. हे यकृतासाठी एक शक्तिशाली टॉनिक मानले जाते जे रक्त शुद्ध करते.

Liver Cleansing Herbs - Health Tips
Health Tips : ‘या’ आजारांमुळे Kidney होवू शकते निकामी, वेळीच घ्या काळजी

गुडुची (Guduchi)

गुडुची ही एक शक्तिशाली डिटॉक्स औषधी वनस्पती आहे जी यकृत आणि मूत्रपिंड मजबूत आणि शुद्ध करण्यासाठी कार्य करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. पित्ताला शांत करणे फायदेशीर आहे.

आवळा (Awla)

आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. त्यात वाढलेला पित्ता शांत करण्याची क्षमता आहे. आवळ अतिशय गुणकारी असून पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकते. हे यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते.

Liver Cleansing Herbs - Health Tips
Health Tips for Women: हेल्दी राहण्यासाठी महिलांनी रोज ही १० कामं करणं गरजेचं

हळद (Termaric)

त्वचा, पचन, यकृत आणि मेंदूसाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदी, जी अन्नाची चव आणि रंग वाढवते, त्यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात आणि म्हणूनच ते यकृताच्या सर्व ऊती आणि पेशी सुधारण्याचे कार्य करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com