Silent Liver Disease Symptoms: लक्षणं दिसत नाहीत, पण यकृत बिघडतंय...'सायलेंट किलर'पासून सावध राहा! डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Is Indian Diet Causing Liver Problems: लक्षणांशिवाय पसरणारा यकृत विकार आता तरुणांनाही झपाटतोय; डॉक्टरांचा इशारा – वेळेत खबरदारी घ्या!
A Liver Disease is Silently Killing Millions | Metabolic Dysfunction-Associated Steatotic Liver Disease
A Liver Disease is Silently Killing Millions | Metabolic Dysfunction-Associated Steatotic Liver Diseasesakal
Updated on

Symptoms of Fatty Liver Without Alcohol: जगभरात एक आरोग्यविषयक संकट झपाट्याने वाढत आहे, पण दुर्दैवाने अनेकांना याची जाणीवही नाही. हा आजार कुठलेही ठोस लक्षण न देता शरीरात घर करून बसतो आणि उशिरा लक्षात आल्यावर मोठे नुकसान करून जातो. जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ज्ञांनी आता कठोर इशारा दिला आहे की, यकृताचे दीर्घकालीन आजार; विशेषतः Metabolic Dysfunction-Associated Steatotic Liver Disease (MASLD) आणि Metabolic Dysfunction-Associated Steatohepatitis (MASH) हे जर वेळेत ओळखले गेले नाहीत, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असतील.

पूर्वी फक्त मद्यपान करणाऱ्यांमध्ये आढळणारा MASLD आज अतिरिक्त साखर व जास्त चरबीयुक्त आहारामुळे लहानांपासून तरुणांपर्यंत दिसतोय. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी याला भारतासाठी या आजाराचा मोठा धोका असल्याचं म्हटलं आहे. पण काय आहे नक्की हा आजार आणि हा आजार होण्याची कारणं काय ते जाणून घेऊया.

MASLD आणि MASH म्हणजे काय?

MASLD म्हणजे यकृतामध्ये चरबी साठण्यामुळे होणारा आजार असून, तो सध्या जवळपास प्रत्येक तिसऱ्या प्रौढामध्ये दिसतो, तर त्याचा पुढचा आणि अधिक गंभीर टप्पा असलेला MASH सुमारे ५% लोकसंख्येला प्रभावित करतो.

या आजारांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे अनेक लोकांना आपल्याला हा त्रास आहे हेच कळत नाही. जेव्हा त्रास जाणवायला लागतो, तेव्हा तो यकृत सिरोसिस किंवा कॅन्सरसारख्या गंभीर अवस्थेत पोहोचलेला असतो. जास्त साखर आणि चरबीयुक्त अन्न, कमी हालचाल, लठ्ठपणा, मधुमेह किंवा हृदयविकाराचा धोका असलेल्यांना या आजाराची शक्यता अधिक असते.

तज्ज्ञांचा इशारा

स्पेनमधील बार्सिलोना शहरात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदेत, जगभरातून आलेल्या तज्ज्ञांनी यकृताच्या विकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की MASH नावाचा आजार ओळखण्यात आरोग्य यंत्रणांना अजूनही खूप अडचणी येत आहेत, आणि त्यामुळे २०२७ पर्यंत या आजाराचं निदानाचं प्रमाण दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे.

ISGlobal संस्थेचे डॉ. जेफ्री लाझरस यांनी स्पष्ट केलं की, या आजाराचा धोका टाळण्यासाठी वेळीच लक्ष देणं आणि प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वैयक्तिक लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमित चाचण्या, तसेच धोक्यात असलेल्या लोकांची ओळख लावून वेळेत उपचार सुरू करणे यावर भर दिला.

कशामुळे होतो हा आजार?

आपल्या रोजच्या जेवणात भात, पोळी, बटाटे, साखर अशा कार्बोहायड्रेट्सचा खूप मोठा हिस्सा असतो. हे पदार्थ चविष्ट असले, तरी त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले प्रथिने आणि फायबर फारच कमी असतात. त्यात जर शारीरिक हालचालही कमी असेल; म्हणजेच दिवसभर बसून राहणं, व्यायाम न करणं, तर ही सवय हळूहळू आपल्या यकृतावर वाईट परिणाम करू शकते. अशी असंतुलित आणि निष्क्रीय जीवनशैली आपल्या लिव्हरचं आरोग्य बिघडवते.

जास्त साखर, फ्रोजेन आणि प्रोसेस्ड फूड खाल्ले तर, त्यातील साखरेचं चरबीत रूपांतरित होतं. ही चरबी थेट यकृतात साठते आणि NAFLD किंवा MASLD चं रूप घेते.

उपाय

तज्ज्ञांच्या मते –

  • साखर, शीतपेय, बेकरीतले आणि तळलेले पदार्थ टाळा

  • आहारात प्रथिनं, फायबर, भाजीपाला आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा

  • दररोज किमान ४५ मिनिटे चालणे, व्यायाम किंवा कोणतेही शारीरिक हालचाल करणारे काम करा

  • वजन नियंत्रित ठेवा

  • दरवर्षी यकृत तपासणी (LFT) करून घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com