

Liver Disease Symptoms: बदललेलं जीवनमान, फास्टफूडचा अतिरेक आणि त्यामुळे वाढलेलं वजन..या प्रकारमुळे फॅटी लिव्हरची समस्या वाढत चालली आहे. आधी हा आजार केवळ दारु पिणाऱ्या लोकांना व्हायचा. परंतु आता नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास सामान्य झाला आहे. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होणं. यामुळे हळूहळू लिव्हरचं फक्शनिंग कमी होत जातं आणि गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या घरबसल्या ओळखा आणि त्यावर उपाय करा.