

Forcing A Locked Jaw Can Tear Muscles!
esakal
How To Unlock Your Jaw Safely: अनेक वेळा मोठी जांभई देताना किंवा जेवताना अचानक जबडा लॉक होतो आणि तोंड उघडेच राहते. ही परिस्थिती अत्यंत भीतीदायक आणि वेदनादायी असू शकते. अशा वेळी अनेक जण घाबरून ताकदीने तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात, पण डॉक्टरांच्या मते ही चूक खूप महागात पडू शकते.
जेव्हा जबडा गरजेपेक्षा जास्त उघडला जातो, तेव्हा 'टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट' (Temporomandibular Joint) (TMJ) मध्ये बिघाड होतो किंवा तिथल्या स्नायूंमध्ये अचानक पेटके (Spasms) येतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'ट्रिसमस' म्हटले जाते.
अशा वेळी तोंड बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर -
जबड्याचे स्नायू फाटू शकतात.
लिगामेंट्सवर अतिताण येऊ शकतो.
जबड्याचे हाड आपल्या जागेवरून पूर्णपणे घसरू शकते (Dislocation).