One Medicine and Now You Can Live for 150 Years
sakal
Science Formula to Live 150 Years: आपल्याला वाढदिवसाला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा नेहमी मिळतात किंवा आपणही दुसऱ्यांना जास्तीत जास्त आयुष्य लाभावं असं म्हणतो. पण एखादा माणूस खरंच १०० वर्षं किंवा दीर्घायुष्य जगेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. मात्र आता ते खरंच घडणार असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण आता विज्ञान या दिशेने पुढे सरकत असल्याचं दिसतं आहे.
चीनमधील शेंझेन येथील शास्त्रज्ञांनी PCC-1 नावाचं हे आयुष्य वाढवणारं औषध तयार केलं आहे. हे काम Longevvie Biosciences या लॅबमध्ये करण्यात आलं आहे. PCC1 म्हणजेच प्रोसायनिडिन C1 असं या औषधाचं नवा असून हे द्राक्षाच्या बियांमध्ये आढळणारं एक नैसर्गिक पॉलीफेनॉल कंपाऊंड आहे. याला सेनोलाइटिक कंपाउंड म्हटलं जातं.