Lose Belly Fat Food: आजच्या काळात वजन कमी करणं ही फक्त सौंदर्यासाठी गरज राहिलेली नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विविध डाएट्स, सप्लिमेंट्स आणि फॅड ट्रेंड्स वापरतात, पण त्यामध्ये अनेकदा पोषणमूल्यांचा कमतरता असते..म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करतानाच शरीराला आवश्यक ते पोषण मिळवायचं असेल, तर ज्वारीची भाकरी हा तुमच्यासाठी योग्य आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो. तुम्ही बरोबर ऐकलंत ज्वारीची भाकरी ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात एक सुपरफूड ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया ज्वारीच्या भाकरीचे इतर फायदे..Intern Teaches CEO: ९ वर्षांपूर्वी मी चीट केलं..! 'त्या' इंटर्नने शिकवला CEO ला आयुष्यभराचा धडा .वजन कमी करण्यात प्रभावीज्वारीमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते, जे मेटाबॉलिझम वाढवते आणि शरीरातील साचलेली चरबी कमी करण्यात मदत करते. ज्वारी खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं वाटतं, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अन्हेल्दी खाण्यापासून तुम्ही वाचू शकता.पचन सुधारतेज्वारी फायबरयुक्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. ती बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवून देते. ज्यांना पचनाचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी एक उत्तम पर्याय आहे..हृदयाचे आरोग्य राखतेज्वारी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते, त्यामुळे ती डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. त्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचं आरोग्य राखण्यात मदत करतात आणि हृदयविकार व उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांचा धोका कमी करतात.रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेज्वारीमध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्ससारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराची इम्युनिटी वाढवतात आणि हाडं मजबूत करतात..Hyperosmia Causes Symptoms: गरोदरपणात वास अधिक जाणवतो? जाणून घ्या हायपरोस्मियाचे कारण आणि उपाय.कसा वापर करावा?- तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात ज्वारीची भाकरी खाऊ शकता.- ती मल्टिग्रेन पीठात (बाजरी, नाचणी, गहू) मिसळूनही वापरू शकता.- ज्वारीच्या पीठापासून पराठा किंवा उपमा देखील बनवता येतो..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.