Loss Of Interest In Sex : 'या' एका कारणामुळे कमी होते सेक्सची इच्छा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loss Of Interest In Sex

Loss Of Interest In Sex : 'या' एका कारणामुळे कमी होते सेक्सची इच्छा !

Loss Of Interest In Sex : अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे लैंगिक संबंध ही सुद्धा माणसाची एक नैसर्गिक गरज आहे. पण काही वेळा स्त्री आणि पुरुषांमधली ही इच्छाच कमी होते. यामुळे आपलं काही चुकतंय का? आपण अ‍ॅबनॉर्मल आहोत का असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताण घेऊन हे लोक वावरत असतात.

लैंगिक इच्छा कमी होण्यामागे अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक कारणीभूत असतात. त्यात प्रमुख घटक म्हणजे पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होणे, चिंता, नीट झोप न लागणे असे बरेच कारणे आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी झाल्यास त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

हेही वाचा: Cramps During Sex : सेक्स करताना क्रॅम्प येतो? हे वाचाच

त्यांना नैराश्याचा सामना करावा लागतो. त्यासोबतच त्यांना मूड स्विंग (Mood Swings), लैंगिक रुची कमी होणे, बुद्धीमत्ता कमी होणे, चार लोकांशी भेटता न येणे, चिंता, नीट झोप न लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागेल.

हेही वाचा: Relationship Tips : दीर्घकाळ SEX न करण्याचे काय आहेत दुष्परिणाम, 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अनेकदा लैंगिक संबंधात रस कमी होणे, अशक्तपणा, सुस्ती वय-संबंधित बदल दिसून येते. अनेकजण याला नैराश्याची लक्षणे मानतात. परंतु पुरुषांमध्ये, जर या व्यतिरिक्त दुःख आणि वेदना दिसल्या तर, टेस्टोस्टेरॉन, जो पुरुष हार्मोन आहे, त्यातील टेस्टोस्टेरॉची कमतरता देखील मूडवर परिणाम करतात.

हेही वाचा: Sex During Periods : मासिक पाळीमध्ये सेक्स करावा का? तज्ज्ञ सांगतात...

टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणामध्ये घट

टेस्टोस्टेरॉनच्या प्रमाणामध्ये घट झाल्यामुळे दिसणारी लक्षणे आणि नैराश्याची लक्षणे अनेकदा एकत्र केली जातात. चिडचिड, मूड स्विंग, लैंगिक आवड कमी होणे, आळस, बुद्धिमत्तेचा अभाव, चार जणांना भेटता न येणे, चिंता, एकाग्रता न होणे, झोप न लागणे या दोन्ही गोष्टी दिसतात. यामुळे, कधीकधी टेस्टोस्टेरॉची कमतरता झाल्यास नैराश्य समजले जाते.

लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

पुरुषांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास टेस्टोस्टेरॉनची कमतरता असावी असा संशय घ्यावा. ती कमी झाल्याचे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. भावनिक लक्षणे विशेषत: अचानक वजन वाढणे, कामवासना कमी होणे किंवा लैंगिक क्षमता कमी होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी आता चांगले उपचार उपलब्ध आहेत.

लैंगिक इच्छा आणि लैंगिक क्षमता

साधारणपणे, या संप्रेरकाची पातळी वयानुसार कमी होते. वय हा एकमेव घटक नाही. तणाव, झोप न लागणे, आहारातील बदल, शारीरिक हालचाली कमी होणे किंवा वाढणे हे या चढउतारांना कारणीभूत ठरू शकतात. टेस्टोस्टेरॉन कमी झाल्यास शारीरिक बदलही होतात. मसल्स स्ट्रेंग्थ कमी होणे, स्तनाच्या ऊतींचे प्रमाण वाढणे, शक्ती कमी होणे, अचानक वजन वाढणे, इरेक्टाइल डिसफंक्शन अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते.

टॅग्स :Menphysical contacthealth