

PMC to Launch Affordable PET Scan Centre for Cancer Patients
sakal
Affordable and Low Cost Cancer Treatment in Pune: कर्करोग ग्रस्त गरीब रुग्णांसाठी आवश्यक असणारी 'पेट स्कॅन' तपासणीची सुविधा महापालिकेकडून केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक 'पेट स्कॅन व रेडिओ डायग्नॉस्टिक केंद्र' उभारले जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर महिन्यात ते पूर्ण होऊन केंद्राची सुरुवात होणार आहे. 'पेट स्कॅन व रेडिओ डायग्नॉस्टिक' सुविधा देणारी देशातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.