Lungs Health : निरोगी फुप्फुसाकरिता १० महत्त्वाच्या टिप्स

सिगारेट, बिडी किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखूच्या धुरामुळे कर्करोग आणि विविध प्रकारचे फुफ्फुसाचे आजार होतात.
Lungs Health
Lungs Healthgoogle

मुंबई : श्वसन संस्थेतील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे फुफ्फुसे. शरीरातील नैसर्गिक संरक्षणसंस्था फुफ्फुसांचे रक्षण करत असते.

मात्र ही यंत्रणा सुरळीत राहण्यासाठी, फुफ्फुसाचे आरोग्य निरोगी राहण्याकरीता आणि फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता कमी करण्यासाठी तुम्ही काय करावे याविषयी सांगत आहेत इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे चेस्ट फिजिशियन डॉ. पवनकुमार बिरारीस.

Lungs Health
World lung day 2022 : तुमचे फुप्फुस निरोगी आहे का ? घरबसल्या करा तपासणी...

१. धूम्रपान टाळा :

सिगारेट, बिडी किंवा कोणत्याही प्रकारच्या तंबाखूच्या धुरामुळे कर्करोग आणि विविध प्रकारचे फुफ्फुसाचे आजार होतात. अशा धुरापासून दूर राहणे हा प्रतिबंधाचा मुख्य पैलू आहे.

2. घरातील प्रदूषण टाळा:

डासांकरिता वापरण्यात येणारा कॉइलचा धूर, सुगंधित मेणबत्त्या, अगरबत्ती, चुलीचा धूर हे देखील फुफ्फुसांना हानीकारक ठरतात. धूळ किंवा तीव्र वासाने ऍलर्जी, शिंका येणे, नाक वाहणे किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या दिसून येतात.

ते टाळण्यासाठी धुळ स्वच्छ करण्यासाठी ओला कपडा वापरा जेणेकरुन ही धुळ इतरत्र न उडता त्या कापडास चिकटून राहिल. घरात हवा खेळती राहील हे सुनिश्चित करा. पक्ष्यांची विष्ठा विशेषत: कबुतरांच्या संपर्कात येणे टाळा.

3. वायू प्रदूषणापासून दूर रहा:

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. लाकूड तसेच कचरा जाळणे टाळा. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सायकल, कारपूल, सार्वजनिक वाहतूकीचा वापर करा. परिसरात भरपूर झाडे लावा.

4. व्यायाम करा:

प्रदूषित वातावरणात व्यायाम करणे टाळा. कमीत कमी 20 मिनिटे सातत्याने, माफक प्रमाणात व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा जसे की वेगाने चालणे हे फुफ्फुसासाठी तसेच हृदयासाठी उत्तम आहे. फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्वासोच्छवासाचे व्यायाम शिका.

५. योग आणि प्राणायाम:

फुफ्फुसाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग आणि प्राणायाम उपयुक्त राहिल. या सोप्या तंत्रांचा सराव करणे ही निरोगी फुफ्फुसाची जीवनशैली आहे.

Lungs Health
Men Health : पुरुषांच्या या घाणेरड्या सवयींचे त्वचेवर होतात गंभीर परिणाम

6. संसर्गांना रोखा :

योग्य फेस मास्कच्या नियमित वापरामुळे कोविड-१९ तसेच क्षयरोगापासून दूर राहण्यास मदत होते. फुफ्फुसाचा संसर्ग टाळण्यासाठी हा एक सोपा आणि सर्वात किफायतशीर मार्ग आहे.

7. लसीकरण:

संसर्गाचा उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी लसीकरण ( इन्फ्लूएंझा व्हायरससाठी, न्यूमोकोकल बॅक्टेरिया) न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या लसींबद्दल अधिक माहिती मिळवा.

8. उपचारांचे पालन:

फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांची नियमित औषधे घेणे थांबवू नका.

9. औषधोपचार:

विशेषत: फुफ्फुसाच्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांसाठी (दमा, काळदमा, फायब्रोसिस), बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, प्रदूषित भागात राहणाऱ्या लोकांसाठी, धूम्रपान करणाऱ्यांसाठी फुफ्फुसाची नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.

10. जनजागृती आवश्यक:

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जसे की ई-सिगारेट, हुक्का पार्लर यांच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांकरता शैक्षणिक मोहिमेचे आयोजन केले पाहिजे. 'मुलं शिकवा, कुटुंब शिकेल आणि एक निरोगी सुदृढ राष्ट्र निर्माण होईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com