

Maharashtra Govt to Draft SOP to Tackle Non-Communicable Diseases Among Children
sakal
Maharashtra government health initiative: राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे. या पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडर्डीकर यांनी सांगितले.