खेलेगा इंडिया... : नवीन वर्षाचा फिटनेस संकल्प

सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबरला डान्सिंग फ्लोअरवर ‘हा माझा मस्ती करायचा शेवटचा दिवस आहे.
Fitness
FitnessSakal
Summary

सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबरला डान्सिंग फ्लोअरवर ‘हा माझा मस्ती करायचा शेवटचा दिवस आहे.

- महेंद्र गोखले

सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबरला डान्सिंग फ्लोअरवर ‘हा माझा मस्ती करायचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून मी सिरियसली फिटनेस सुरू करणार आहे,’ असे आश्वासन देत तुम्ही अनेक लोकांना भेटला असाल, परंतु दुर्दैवाने ते वचन पाळण्यात अपयशी ठरला असाल. जानेवारीच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये जिममध्ये किती गर्दी असते हे तुम्हाला माहीत आहे का? अर्थात काही संशोधनातून असे दिसते, की जिमची ६४ टक्के मेंबरशिप पूर्णपणे न वापरलेली असते, ८२ टक्के आठवड्यातून एकापेक्षा कमी वेळा जिममध्ये जातात आणि २२ टक्के सदस्य ६ महिन्यांनंतर पूर्णपणे जाणे बंद करतात.

प्रथम हे का घडते ते आपण समजावून घेऊया?

नवीन वर्षाचे संकल्प अयशस्वी का होतात?

खालीलपैकी एका किंवा सगळ्याच कारणामुळे किंवा नियोजन नसल्यामुळे अयशस्वी होत असावे.

झटपट परिणाम

प्रत्येकाला वाटते की ते जिममध्ये जातील आणि त्यांच्या अनेक वर्षांच्या चुकीच्या सवयी काही आठवड्यात दूर करतील. परंतु तसे होत नाही. खरंतर, तुम्हाला एका महिन्याच्या कालावधीत खूप मोठा बदल अपेक्षित असतो. (अवास्तव ध्येय) परंतु ते करण्यात तुम्ही अयशस्वी ठरता कारण ते साध्य करणे खूप कठीण असते. मग असा निष्कर्ष काढता की ‘जिमचा काही उपयोग नाही.’ म्हणून तुम्ही जिमला जाणे थांबवता.

प्लॅनिंगचा अभाव

आधी विचार न करता आपण कोणतीच गोष्ट करत नाही जसे की नवीन व्यवसाय, घर बांधणे, लग्न वगैरे, मग व्यायाम तरी का करायचा? व्यायामासाठीही एक प्लॅन असणे गरजेचे आहे. तरच अपेक्षित परिणाम साधला जाईल.

विशिष्ट ध्येयाचा अभाव

तुमच्याकडे प्लॅन असतो तेव्हाच एक ध्येय देखील असते. तर तुमचे ध्येय काय आहे? काही वेळा जिममध्ये नवीन असलेल्या व्यक्तीला तिथे व्यायाम कसा करावा हे माहीत असले तरीही त्यांच्यासमोर कोणतेही ध्येय नसते. ध्येय असल्‍याने आपण जे करत आहोत ते करण्‍याचा उद्देश आणि कारण मिळते. साधे ध्येय व्यायामात सातत्य ठेवते आणि शारीरिक क्षमता सुधारते.

खूप कठोर, खूप जलद

जे लोक काही महिन्यांपासून किंवा वर्षानुवर्षे व्यायाम करत नसतात, त्यांना वाटते की ते जिममध्ये जाणे आणि व्यायाम करणे त्यांना सहज शक्य आहे. ते जाऊन दररोज २-३ तास व्यायाम करू शकतात. कदाचित हे सर्व शक्य होईलही, परंतु आपल्याला अपेक्षित परिणाम साध्य करता येईल का? कारण आपल्या शरीराला अशा प्रकारे कार्य करण्याची सवय नाही. महिनाभर कठोर परिश्रम केल्याने कोणालाही खूप मोठा बदल साध्य करता येत नाही. अनेक वर्षे सातत्य राखले तर बदल घडू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com