
Malaria Cases Likely to Rise in December-January, Warns Dr. Abhay Bang
sakal
Dr. Abhay Bang Warns About Malaria Rise in December-January: लांबलेला मान्सून विचारात घेता येत्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने उपाययोजना युद्धपातळीवर अंमलात आणाव्यात, अशा सूचना डॉ. अभय बंग यांनी दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून मलेरिया निर्मलूनसाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. डॉ. बंग या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत.