Malaria Vaccine : मलेरियाच्या विरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केली नवीन लस, जेएनयू विद्यापीठाचे संशोधन

Malaria Vaccine : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) शास्त्रज्ञांच्या टीमने ही मलेरियावरील लस शोधली आहे.
Malaria Vaccine
Malaria Vaccineesakal

Malaria Vaccine : जगभरात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हा मलेरिया आजारामुळे होतो. हा एक गंभीर आजार आहे. डासांमार्फत होणाऱ्या या आजारावर वेळीच उपचार नाही केले तर रूग्णाला मृत्यू येऊ शकतो. परंतु, या मलेरिया आजारावर नुकतीच एक लस शोधण्यात आली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) शास्त्रज्ञांच्या टीमने ही मलेरियावरील लस विकसित केली आहे. ही लस मलेरियाविरूद्ध अधिक प्रभावी आणि आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

सेल प्रेसच्या iScience एका जर्नलमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यांचे हे संशोधन लस विकसित करण्यासाठी परजीवी प्रोहायबिटिन प्रोटिनचे एक नवीन लक्ष्य म्हणून समोर आले आहे. मलेरिया हा आजार मादी ॲनोफिलीस डासाद्वारे पसरणारा एक वेक्टर-जनित रोग आहे.

Malaria Vaccine
Covid: सिंगापूरनंतर भारतातही पसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

या आजाराने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या आजारावर आतापर्यंत सतत संशोधन आणि प्रयत्न करण्यात आले आहे, तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ च्या अहवालात जगभरात २४९ दशलक्ष प्रकरणे आणि 60 हजार ८०० मृत्यूंसह एक भीषण चित्र समोर आले आहे.

जेएनयू टीमने नेमके काय केले?

स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसनच्या जेएनयूमधील प्राध्यापिका शैलजा सिंह आणि प्राध्यापक आनंद रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या संशोधनात एक नवीन होस्ट-परजीवी इंटरॅक्टिंग कॉम्प्लेक्स ओळखले आहे. जे एक यशस्वी लस धोरण अनलॉक करण्याची एक महत्वाची गुरूकिल्ली असू शकते.

दरम्यान, या संदर्भात बोलताना प्राध्यापिका शैलजा सिंह म्हणाल्या की, आमच्या संशोधनात आम्ही एक नवीन PHB2-Hsp70A1A रिसेप्टर लिगँड जोडी ओळखली आहे. ही जोडी परजीवीला मानवी शरीराच्या आत संसर्ग होण्यास मदत करते. यावर आता परजीवी प्रोटिन PHB2 एक ताकदवान लस म्हणून काम करू शकते.

दरम्यान संशोधकांनी हे शोधून काढले आहे की, मेरोजोइटच्या पृष्ठभागावर आढळून येणारे PfPHB2 प्रोटिन लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील हीट-शॉक प्रोटिन Hsp70A1A सोबत क्रिया करते. विशेष म्हणजे या अ‍ॅंटीबॉडी उपचारांमुळे यामध्ये व्यत्यय आणल, ज्यामुळे परजीवीची वाढ पूर्णपणे थांबली

Malaria Vaccine
Climate Change On Malaria :  मलेरिया डासांच्या वाढीवर क्लायमेट चेंजचा थेट परिणाम होतोय, WHO ने दिला धोक्याचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com