

Malaria Symptoms
esakal
Malaria: उन्हाळ्यानंतर पावसाळा आपल्याला नक्कीच आराम देतो, पण सोबतच अनेक आजारांनाही निमंत्रण देतो. या दिवसांत जागोजागी पाणी साचल्यामुळे डासांची पैदास वेगाने होते आणि यामुळेच मलेरिया (Malaria) सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.
अनेकदा लोक मलेरियाच्या सुरुवातीच्या लक्षणांना साधा व्हायरल इन्फेक्शन किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात, जे नंतर अंगावर बेतू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर आपण वेळेवर लक्षणं ओळखली आणि उपचार सुरू केले, तर पुढील मोठा धोका टाळता येऊ शकतो.