
श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचा मोह होणार नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. तेजस्वी पिवळा रंग, मोहक मधुर गंध, अविट गोड चव आणि रसरशीत मऊ गर अशी एकाहून एक सरस वरदाने निसर्गाने आंब्याला दिली आहेत.
आंब्याच्या साधारणतः हजार जाती अस्तित्वात आहेत. हापूस, पायरी, राजापुरी, तोतापुरी, लंगडा, मद्रास हापूस, रायवळ, बदामी, सुवर्णरेखा, नीलम, रुमानी असे अनेक प्रकारचे आंबे असतात.