

Monsoon Skin Alert: The Ringworm Risk
esakal
Fungal Mistakes to Avoid: पावसाळा सुरू झाला की निसर्ग सुंदर दिसू लागतो, पण याच ऋतूत आरोग्याच्या अनेक समस्याही डोके वर काढतात. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे सध्या 'रिंगवर्म' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. हा संसर्ग 'डर्माटोफाइट्स' (Dermatophytes) नावाच्या फंगसमुळे होतो, जो आपल्या त्वचेतील केराटिन प्रोटीनवर वाढतो. वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात वेगाने पसरू शकतो.