Home Made Face Mask: हे मास्क करेल डोळ्यांखालची काळी वर्तुळं दूर

डोळ्याच्या आजुबाजूचा भाग हा अत्यंत नाजूक असल्याने डार्क सर्कल्ससाठी कोणतीही क्रिम लावणं धोकादायक ठरू शकतं. अशात तुम्ही काही घरगुती उपायांनी ही काळी वर्तुळं दूर करू शकता
Home Made Face Mask
Home Made Face MaskEsakal
Updated on

असं म्हणतात जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे डोळे देखील बोलत असतात. डोळे Eyes ही देखील तुमची एक ओळख असते. डोळ्यामुळे तुमचं सौदर्य खुलून येतं. मात्र काही वेळेला डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळं Black Circles तुमच्या या सौंदर्याला ग्रहण लावतात. Marathi Beauty Tips Remove Dark Circles around your Eyes

डोळ्यांभोवती येणाऱ्या डार्क सर्कल्ससाठी अनेक कारणं जबाबदार आहेत. अपुरी झोप Sleep, लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर Computer तासंतास काम करणं, तसचं ताण आणि अयोग्य आहार यामुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळं येत असतात.

डोळ्याच्या आजुबाजूचा भाग हा अत्यंत नाजूक असल्याने डार्क सर्कल्ससाठी कोणतीही क्रिम लावणं धोकादायक ठरू शकतं. अशात तुम्ही काही घरगुती उपायांनी ही काळी वर्तुळं दूर करू शकता. आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल्स कमी कऱण्यासाठी काही घरगुती मास्क सांगणार आहोत.

तांदळाच्या पीठाचा मास्क- डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी अंडरआय मास्क तयार करण्यासाठी एका वाटीत १ चमचा तांदळाचं पीठ आणि १ चमचा मलई घेऊन चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा आणि डोळ्यांखाली अंडरआय मास्क लावा.

हा मास्क पूर्णपणे वाळल्यानंतर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. दिवसातून एकदा आठवडाभर हा प्रयोग केल्यास डार्क सर्कल्स दूर होतील.

बटाटा आणि पुदीना मास्क- बटाट्यामध्ये स्किन टायटनिंग गुण आढळतात. तसचं बटाट्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. अनेकदा कमी झोप किंवा डोळ्यांवर अती ताण आल्याने डोळ्यांखाली सूज येऊन डार्क सर्कल्स दिसू लागतात. पुदीन्यातील थंडाव्यामुळे ही सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

बटाटा आणि पुदीना मास्क तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा आणि पुदिन्याची १२-१५ पानं मिस्करच्या मदतीने बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका सुती कापडाच्या मदतीने या मिश्रणाचा रस काढून घ्या. यानंतर कापसाची पट्टी या रसामध्ये बुडवून ही पट्टी डोळ्यांवर ठेवा. १२ मिनिटांसाठी डोळे मिटून ठेवा.

यामुळे डोळ्याखालील सूज कमी होण्यास मदत होईल. तसचं काळी वर्तुळदेखील कमी होतील.

हे देखिल वाचा-

Home Made Face Mask
Healthy Eyes साठी करा ही योगासनं, चष्मा लावण्याची गरज नाही

कॉफी मास्क- कॉफिमधील पोषक तत्व त्वचा उजळण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठीच डोळ्यांखालची काळी वर्तुळ दूर करण्यासाठी तुम्ही कॉफीच्या मास्कचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा कॉफीमध्ये नारळाचं तेल टाकून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट डोळ्यांखील लावा.

कॉफीची पेस्ट डोळ्यांखाली काही वेळ राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. नारळाच्या तेलाएवजी तुम्ही मध देखील वापरू शकता.

ग्लिसरीन आणि संत्र्याचा रस- संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असल्यामुळे ते त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यातील विटामिन सी तसचं इतर पोषक तत्वांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. तसचं यातील विटामिन ए मुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

संत्र्याचा मास्क तयार करण्यासाठी २ चमचे संत्र्याचा रसामध्ये १ चमचा ग्लिसरीन मिसळा. त्यानंतर कॉटन पॅड या मिश्रणात बुडवून ते डोळ्यांच्या खाली काही वेळासाठी ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे डार्क सर्कल कमी होतील शिवाय डोळ्याला आरामही मिळेलं.

गुलाबजल- गुलाबपाणी हे डार्क सर्कल्स कमी करून डोळ्याना थंजावा देण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. यासाठी कापसाचे बोळे गुलाबजलमध्ये ओले करून ते डोळ्यांवर ठेवावे. तुम्ही दुपारी किंवा रात्री झोपताना हा उपाय करू शकता. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळून शांत वाटेल तसचं डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

कोरफड- कोरफड किंवा एलोवेरा जेलच्या मदतीनेही डार्क सर्कलची समस्या कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही बाजारात मिळणार एलोवेरा जेल वापरू शकता. तसचं ताज्या कोरफडीचा गरही वापरल्यास अधिक फायदा होईल. एलोवेरा जेल किंवा कोरफडीच्या गरामध्ये २ थेंब लिंबाचे मिसळावे. त्या

यानंतर या जेलने डोळ्यांखाली बोटांनी हलंक मसाज करावं. काही वेळाने डोळे धुवावे

अशाप्रकारे काही घरगुती उपायांनी तुम्ही डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं कमी करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com