या बियांसोबत Milk चे सेवन केल्यास Bones होतील बळकट, एनर्जी बूस्ट करण्यासोबत अनेक फायदे

अळशी किंवा जवसाच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडसोबतच अनेक पोषक तत्व असतात. आज आपण अळशीच्या बियांमधील पोषक तत्व आणि त्याचं दुधासोबत सेवन केल्यास होणाऱे फायदे जाणून घेणार आहोत
अळशी आणि जवसाचे फायदे
अळशी आणि जवसाचे फायदेEsakal

माणसाच्या संपूर्ण शरीराचा भार या त्याच्या हाडांवर Bones असतो. यासाठीच हाडं बळकट असणं अधिक गरजेचं असतं. हाडं मजबूत असतील तर अनेक कठिण आणि कष्टाची काम केल्यानंतरही सांधेदुखी किंवा हाडांचं दुखण्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. Marathi Health Tips Advantages of Alashi and Jawas Seeds for Bones

हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिमयमची Calcium अधिक आवश्यकता असते. यासाठी आपण नियमित दूधाचा आहारामध्ये Diet समावेश करतो. मात्र या दूधाची पौष्टिकता वाढवून त्याचा शरीरासाठी अधिक फायदा करून घेणं शक्य आहे. यासाठी दूधासोबत तुम्ही अळशी किंवा जवसाच्या बियांचा समावेश करू शकता. 

अळशी किंवा जवसाच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडसोबतच अनेक पोषक तत्व असतात. आज आपण अळशीच्या बियांमधील पोषक तत्व आणि त्याचं दुधासोबत सेवन केल्यास होणाऱे फायदे जाणून घेणार आहोत. 

दूधासोबत अळशीचं सेवन

दूध आणि अळशी  दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, कॅल्शियम, पोटॅशिय, विटामिन बी६, ओमेगा-३ फॅटी ऍसिड, विटामिन डी, प्रोटीन, मॅग्नेशियम आणि इतर हेल्दी फॅट्स असतात. हाडांना मजबूत बनवण्यासाठी आणि हाडांचं स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी दूधासोबत अळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. यासाठी दूधाचं सेवन करत असताना त्यात एक चमचा जवसाच्या बियांची पावडर मिसळा. यामुळे दुधाची चव चांगली लागेल आणि दूध आरोग्यवर्धक बनेल, 

याशिवाय तुम्हा आणखी एका प्रकारे अळशीचं सेवन करू शकता. दूध पिण्यापूर्वी तुम्ही एक चमचा भाजलेल्या अळशीच्या बियांचं सेवन करा आणि त्यानंतर त्यावर कोमट दूध प्यायल्यानेही फायदा होईल. 

हे देखिल वाचा-

अळशी आणि जवसाचे फायदे
Milk And Calcium: तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमची गरज दूध पूर्ण करत का?
  • जवसाच्या बिया असलेले हे दूध प्यायल्याने हाड आणि स्नायूंचे आरोग्य तर सुधारतेंच शिवाय या दूधामुळे शरीरासाठी इतरही अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. 

  • वजन कमी करण्यासाठी देखील अळशीच्या दूधाचं सेवन फायदेशीत ठरू शकतं. 

  • अळशीच्या दुधामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लागत नाही.

  • निरोगी हृदयासाठी अळशीच्या बिया गुणकारी असतात. यातील ओमेगा-३ फॅटी ऍसिड हृदयासाठी फायदेशीर असतं. तसचं रक्तदाब नियंत्रणात राखण्यास या बियांचं सेवन फायदेशीर ठरतं. 

  • कोलेस्ट्रॉल कमी करतं- अभ्यासानुसार जवसाच्या सेवनामुळे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्याचसोबतत चांगल कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणजेच जवसाच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी  नियंत्रणात आणण्यास मदत होते. या अभ्यासानुसार रोज चार चमचे म्हणजेच जवळपास ३० ग्रॅम जवसाचं सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी १५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होते. 

  • कॅन्सरचा धोका कमी- जवसाच्या सेवनाने कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासूनही सुटका होवू शकते. या बियांमध्ये लिग्नास अँटीऑक्सिडंट आणि एस्ट्रोजन तत्व असल्याने कॅन्सरचा धोका कमी होवू शकतो.

  • संधिवात दूर करण्यास मदत- जवसमध्ये अँटीआर्थराइटिक म्हणजेच संधीवात कमी करण्यासाठी आवश्यक प्रबाव असतो. त्यामुळे संधिवाताची समस्या असलेल्यांनी आहारामध्ये अळशीचा समावेश करावा. 

  • पचनास मदत- अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असतं. त्यामुळे पचनसक्ती सुधारण्यास मदत होते. तसचं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 

  • शाकाहारींसाठी प्रोटीन स्त्रोत- जर तुम्ही मासं-मच्छीचं सेवन करत नसाल तर जास्तीत जास्त प्रोटीन मिळवण्यासाठी जवस हा शाकाहारी लोकांसाठी चांगला पर्याय आहे. अळशीला प्लांट बेस्ट प्रोटीन मानलं जातं. याचं सोबत मांसाहारातून मिळणार ओमेगा ३ फॅटी ऍसिडही जवसाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं.

अशा प्रकारे तुम्ही जवसाचं दूधासोबत सेवन करूनही त्याचे शरीरासाठी फायदे करुन घेऊ शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com