Calcium Deficiency : वयाच्या ३५शीतच उठता-बसताना सतावतेय कंबर, गुडघे दुखी? आताच व्हा सावध

कॅल्शियम माणसाच्या ओव्हर ऑल आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेने गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
Calcium Deficiency
Calcium Deficiencyesakal

Calcium Deficiency : कॅल्शियम माणसाच्या ओव्हर ऑल आरोग्यासाठी फार आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेने गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. याच्या कमतरतेने ऑस्टिओपोरोसिस, ब्लड प्रेशप, स्नायुंमध्ये दुखणे, हाडं आखडणे, हृदय रोग असे अनेक गंभीर आजार जडू शकतात. दूध आणि त्यापासून बनलेले प्रॉडक्ट्स कॅल्शियमचा सर्वात चांगला स्रोत आहे. पण जर तुम्ही दूध घेऊ शकत नसाल तर इतरही गोष्टी आहेत ज्यातून कॅल्शियम मिळू शकते.

कॅल्शियम शरीरासाठी फार आवश्यक तत्व आहे. यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत राहतात. याशिवाय हृदय आणि स्नायूंसाठीही कॅल्शियम फार आवश्यक असतं. रक्त वाहतं राहण्यासाठी कॅल्शियम फार आवश्यक आहे. शिवाय शरीराच्या विकासातही याची महत्वाची भूमिका आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेने होतात हे आजार

ब्लड प्रेशर, स्नायू आणि हाडे आखडणे, दात दूखणे, ड्राय स्कीन, नखे कमकूवत होणे आणि तुटणे या सारखे आजार होतात. यामुळे हृदय रोग होण्याची शक्यता वाढते. यामुळे हार्टअॅटॅक आणि स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. यासाठी डाएटमध्ये दूध, पनीर आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करणं आवश्यक आहे.

Calcium Deficiency
Health Tips : पदार्थ गरमच चांगला लागतो? खरंय पण दुष्परीणाम जाणून घ्या नाहीतर...

या पदार्थांमधूनही मिळतं कॅल्शियम

जर तुम्ही नॉन डेअरी प्रॉडक्ट शोधत असाल तर ड्रायफ्रुट खाणं उत्तम पर्याय ठरू शकतो. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. यामुळे साधारण एक कप बदामातून ३८५ मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज भागते. यात फायबर बरोबर मॅग्नेशियम, मँग्नीज, व्हिटॅमिन ई उत्तम प्रमाणात असतं.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्येही भरपूर कॅल्शियम असतं. यामुळे शरीराची २१ टक्के कॅल्शियमची गरज भागते असं अभ्यासातून समोर आलं आहे. यात व्हिटॅमिन ए बरोबर, व्हिटॅमिन के, ई, सी, बी१, बी २, बी ३, बी ५ आणि बी ६ शिवाय बीटा कॅरेटीन, फोलेट याचंही भरपूर प्रमाण असतं.

Calcium Deficiency
Health Tips : गुळापेक्षाही अधिक पौष्टीक आहे काकवी? काय आहेत फायदे जाणून घ्या!

बीया असणाऱ्या भाज्या

भोपळा, चीया सीड अशा भाज्या शिवाय तीळ खाल्ल्यानेही आपण कॅल्शियम मिळवू शकतो. १०० ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने साधारण ९५ टक्के कॅल्शियम मिळू शकते. शिवाय या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम, आयरन, फॉस्फरस, झिंक आणि सेलेनियम असतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com