हेल्थ इज वेल्थ

Health is Wealth
Health is Wealthesakal

"निसर्गाची किमया म्हणजेच आपल्याला मिळालेले अद्भुत असे मानवी शरीर. यामधील प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा आहे. पण आपण शरीराच्या विशिष्ट भागाची अधिक काळजी घेतो व इतर भागांकडे मात्र दुर्लक्ष करतो. मनुष्याचा सौंदर्याचा सर्वसाधारणपणे विचार केल्यास सर्वांत प्रथम त्याचा चेहरा हा दर्शनी असतो. कोणीही प्रथम चेहराच बघतो आणि चेहऱ्यावरील सौंदर्य, त्यावरील मुद्रा, त्यावरील हावभाव यावरूनच सर्वसाधारणपणे व्यक्तीचे सौंदर्य कसे आहे, याचे मूल्यमापन केले जाते. चेहऱ्याचे सौंदर्य अथवा आरोग्याचा अविभाज्य घटक म्हणजे आपले दात. आपल्या शरीराची संपूर्ण चालणारी प्रक्रिया आपण जे अन्न घेतो, ते दातांच्या माध्यमातूनच पुढे जाते, त्यामुळे हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे."
- डॉ. विशाल जाधव

(marathi latest article Health is wealth by dr vishal jadhav nashik news)

Health is Wealth
‘एव्हरेस्ट’चा सीझन

‘तुमचा चेहरा सुंदर असेल, पण तुमचे दात खराब असतील, तर तुमचे सौंदर्य खुलून दिसत नाही.’ आता तुम्ही म्हणाल सौंदर्य हे बाह्य अंगावर नाही, तर अंर्तमनावर अवलंबून असते. हो... ते खरे असले तरी तुम्ही ज्यावेळी गोड हसता, त्या वेळी तुमच्याकडे अनेकांच्या नजरा आकर्षित होतात.

त्या वेळी ते तुमचा रंग, तुमचा बांधा किंवा इतर गोष्टी पाहत नाहीत, तर पाहत असतात गोड हसू. आता हसल्यावर दात तर दिसणारच ना! म्हणूनच दातांची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. आता दातांच्या सौंदर्याचा विचार करता, तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, ते समजून घेणे गरजेचे आहे.

व्यक्तिमत्त्व कितीही भारदस्त असलं तरीही अनेकदा वेडेवाकडे, मोठे व पिवळे दात सौंदर्यात अडसर निर्माण करतात. म्हणूनच दंतसौंदर्याला आणि अलीकडे प्रचलित झालेल्या दंतशास्त्राला मोठं महत्त्व प्राप्त झालंय.

दात देतात आरोग्याचे संकेत

अन्न चघळणे आणि ते चावणे, केवळ हेच दातांचे कार्य नसून आपल्या एकूणच आरोग्यामध्ये दातांचा महत्त्वाचा सहभाग असतो. तुमची ओरल हेल्थ (मौखिक आरोग्य) सुधारायची असेल, तर दातांची काळजी घेणे ही अत्यंत आवश्यक व न टाळता येणारी बाब आहे.

आपला दात दुखत असेल, तर आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर सांगतात, की दातास कीड लागण्यास सुरवात झाली आहे. आपण क्षणाचाही विलंब न करता सांगतो, दात काढून टाका.

इतर भाग दुखत असेल तेव्हा आपण डॉक्टरला असे सांगत नाही, की माझा तो भाग काढून टाका. उदाहरणार्थ आपल्या पायाची बोटे किंवा हाताची बोटे दुखत असतील, तर डॉक्टरला आपण असे सांगतो का? माझे बोट काढून टाका, नाही ना!

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Health is Wealth
मोगऱ्यांची मराठी रसिकास प्रार्थना!

मग दातांबद्दलच इतकी अनास्था का?

मानवाचे दात जन्मापूर्वीच तयार होत असतात. बाळ जन्माला येताना त्याच्या मुखात दात नसले, तरी ते गर्भाशयातच मूळ धरतात. हे दात बाळाच्या जन्माआधीच विकसित होऊ लागतात आणि साधारणत: बाळ सहा ते बारा महिन्यांचे झाल्यावर ते येऊ लागतात.

दात हा आपल्या मानवी शरीराचा अत्यावश्यक भाग आहे. ते आपल्याला अन्न चघळण्यास, चावण्यास, स्पष्टपणे बोलण्यास आणि आपल्या चेहऱ्याची रचना राखण्यास मदत करतात. दातांद्वारे जर अन्न चावले जात नसेल, तर कच्चे अन्नच पोटात जाते. त्यामुळे पोटाचे विकार, गॅस यासारखे आजार जडतात.

ॲसिडिटी वाढते आणि भविष्यात त्याचे रूपांतर मोठ्या आजारातही होऊ शकते, असे असूनही बरेच लोक त्यांचे दात गृहीत धरतात. शरीराच्या इतर भागांच्या स्वच्छतेकडे जेवढे लक्ष दिले जाते, तितके लक्ष दातांकडे दिले जात नाही. अनेक लोक बऱ्याच वेळा दातांची योग्य काळजी आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात.

वास्तविक, आपले दात एकूण आरोग्याविषयी संकेत देत असतात.

१) झोपेत दात आवळणे म्हणजे आपल्या पोटात काहीतरी इन्फेक्शन झाले आहे, असा संकेत असतो.
२) लवकर दात पडल्यास स्मरणशक्ती कमकुवत होते, असेही सर्वेक्षण सांगते.
३) खराब ओरल हेल्थ (मौखिक आरोग्य) हे हृदयरोग, मधुमेह आणि अल्झायमरसह अनेक आरोग्य समस्यांशी जोडले आहे.
४) प्रत्येक व्यक्तीचे दात वेगळे असतात. जसे प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसेच दातांचेही आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीचे दात वेगळे असतात. दातांचे कोणतेही दोन संच एकसारखे नसतात. ज्यामुळे ते ओळख पटवण्यासाठी एक उत्कृष्ट साधन ठरतात.
५) बोलण्यासाठी दात बजावतात महत्त्वपूर्ण भूमिका. होय, ‘थ’ सारखा (दंतव्य) उच्चार अथवा ध्वनी निर्माण करण्यासाठी पुढचे दात, विशेष महत्त्वाचे असतात. हे ध्वनी निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्या उच्चारासाठी आपली जीभ पुढच्या दातांच्या मागच्या बाजूला दाबली जाते. म्हणून त्यांना दंतव्य (उच्चार) म्हटले जाते.

Health is Wealth
सह्याद्रीचा माथा : पर्यावरणाचा बळी देऊन उद्योग नकोत!

चांगल्या ओरल हायजिनमुळे दातांच्या अनेक समस्या टळू शकतात. दिवसभरात दोनवेळा नियमित दात घासणे, अंतर्गत स्वच्छता, काहीही खाल्ल्यावर खळखळून चूळ भरणे, डेन्टिस्ट अथवा दंतवैद्यांची नियमित भेट घेणे यांसारख्या चांगल्या सवयींमुळे दात किडणे, हिरड्यांच्या समस्या आणि दातांच्या इतर समस्या टाळता येऊ शकतात.

थोडक्यात काय, तर दात हे आपल्या एकूण आरोग्यामध्ये अत्यावश्यक भूमिका बजावत असतात. त्यासाठीच दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तोंडी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून, संतुलित आहार घेतल्याने आणि नियमितपणे डेन्टिस्टकडे भेट देऊन तुम्ही तुमचे दात पुढील अनेक वर्षे निरोगी आणि मजबूत ठेवू शकतात.
(लेखक शासकीय रुग्णालयात दंतरोगतज्ज्ञ आहेत.)

विशेषकरून समोरचे दात तुटलेले असतील, तर आपल्याला बोलण्यात अडथळा येतोच, आपला उच्चार समोरच्याला समजत नाही, पण त्याहीपेक्षा आपला आत्मविश्वास कमी होऊन आपल्यात नैराश्याची भावना निर्माण होते.

तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवीन दात इम्प्लांट केल्यामुळे खाण्याची समस्या तर दूर होतेच, पण जगण्याची एक नवीन उमेद प्राप्त होते. अन्नग्रहण व्यवस्थित करता आल्यामुळे पचन व्यवस्थित होते. त्यामुळे अनेक आजार टाळले जाऊ शकतात.

Health is Wealth
Plastic Bottle Germs : प्लास्टिकच्या बॉटलने पाणी का पिऊ नये? कारण वाचाल तर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com