

Measles Cases
esakal
India Measles Explosion: भारतात गोवरच्या (Measles) रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकेच्या 'सीडीसी' (CDC) ने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांतच भारतात २६,६२७ गोवर रुग्णांची नोंद झाली आहे. या धक्कादायक आकडेवारीसह भारत जगात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. २०२५ मध्ये वर्षभरात आढळलेल्या १८,७९४ रुग्णांच्या तुलनेत या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेली ही वाढ चिंताजनक मानली जात आहे. कोरोना महामारीच्या काळात बालकांच्या नियमित लसीकरणात आलेला खंड आणि रोगप्रतिकारक शक्तीतील तफावत यामुळे हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.