Covid Treatment | मशरूमच्या वापराने कोरोना बरा होणार? अमेरिकेत संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशरूमच्या वापराने कोरोना बरा होणार? अमेरिकेत संशोधन

मशरूमच्या वापराने कोरोना बरा होणार? अमेरिकेत संशोधन

अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोरोना महामारीच्या उपचाराबाबत नव्या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमेरिकन शास्त्रज्ञांची एक टीम मशरूमचे औषधी गुणधर्म आणि चिनी औषधी वनस्पतींच्या मदतीने कोरोनावरील उपचारांवर काम करत आहे.

कॅलिफोर्निया-सॅन डिएगो विद्यापीठातील इंटरअॅक्टिव्ह हेल्थच्या संशोधन केंद्रातील संचालकांपैकी एख असलेल्या गॉर्डन सक्से यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. मशरूम प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अँटीव्हायरल प्रभावासाठी वापरलं जातं. यामुळे मशरूमची निवड करण्यात आली.

MACH-19 हा एक बहु-केंद्रीय अभ्यास आहे. जो सॅन-डिएगो स्कूल ऑफ मेडिसिन आणि UC लॉस एंजेलिस आणि ला जोला इन्स्टिट्यूट फॉर इम्युनोलॉजी यांच्या सहकार्याने सुरू आहे.

प्री-क्लिनिकल ट्रायलमध्ये चांगले परिणाम

2019 मध्ये केलेल्या प्री-क्लिनिकल अभ्यासात असे आढळून आले की मशरूममध्ये इन्फ्लुएंझा (H1N1), इन्फ्लूएंझा A (H5N1) आणि नागीण यासह विषाणूंचा संसर्ग रोखण्याची क्षमता आहे. गॉर्डन सॅक्स म्हणतात की, औषधी मशरूममध्ये विषाणूची प्रतिकृती रोखण्याची क्षमता आहे, असं त्यांना वाटतं. आणि त्यांना या सिद्धांताची चाचणी SARS कोविड-19 (SARS-CoV-2) विरुद्ध फेज-2 चाचणीमध्ये करायची आहे.

गॉर्डन सॅक्स म्हणाले की, मशरूमचे अनेक फायदे आहेत आणि ते आपल्यासोबत विकसित झाले आहेत. ज्याप्रमाणे मशरूम जीवाणू, विषाणू आणि इतर बुरशींना बळी पडतात, त्याचप्रमाणे मानव देखील बळी पडतात. ज्याप्रमाणे मशरूम अशा कीटकांशी लढतात, त्याचप्रमाणे ते खाल्ल्याने आपल्याला एक संरक्षण यंत्रणा मिळेल याची खात्री आहे.

MACH-19 संदर्भात सुरू असलेल्या तिसऱ्या चाचणीमध्ये मशरूमच्या औषधी गुणधर्मांचे मूल्यांकन केले जात आहे. हे कोविड लसीकरणाच्या सुरुवातीला कॅप्सूलच्या स्वरुपात दिले जाते. त्यामुळे मशरूमचा वापर कोरोनातून बाहेर येण्यासाठी करणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं.

loading image
go to top