

Fast & Easy Medicine Access: Zepto Collaborates with Ayush Ministry
Sakal
Zepto medicine quick delivery: देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध व्हावी यासाठी आयुष मंत्रालयाने झेप्टो या क्विक-कॉमर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमामुळे पारंपरिक उपचारपद्धतींची उत्पादने ऑनलाइन माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार असून गुणवत्ता आणि नियमपालन यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या करारानुसार आयुष मंत्रालयाच्या निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या मदतीने झेप्टोच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयुष औषधे आणि आरोग्यवर्धक उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. झेप्टो कमी वेळेत वस्तू घरपोच पोहोचवते, त्यामुळे गरज असताना लोकांना औषधे लवकर मिळू शकतील.