Mental Health : पुरुषही रडू शकतो, त्यालाही असते मानसिक आधाराची गरज!

पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत काही गैरसमज, जाणून घ्या सत्य
Mental Health Men
Mental Health Men

Myths about Men Mental Health And Reality : पुरूष आणि महिला दोघेही तणाव चिंता, नैराश्याग्रस्त आहे. पण महिलांच्या तुलनेत पुरुष (men) आपल्या मानसिक आरोग्याबाबत दुसऱ्यांसोबत काहीही शेअर करण्यासाठी संकोच करतात. आपल्या भावना आणि तणावामुळे पुरुष मोकळेपणाने व्यक्त होत नाही कारण आजही समाजामध्ये याकडे टॅबू म्हणून पाहिले जाते.

ओन्ली माया हेल्थनुसार, कोरोना माहामारीच्या काळात महिलांसोबत पुरुषांमध्येही मानिसक आरोग्याच्या समस्या पाहायला मिळाल्या ज्यामध्ये पुरूष मनातल्या मनात कुडत राहणे, आपल्या समस्या इतरांसोबत शेअर करणे टाळतात. ताण आणि नैराश्यग्रस्त कित्येक पुरुष आपल्या समस्या शेअर करण्याऐवजी समाप्त करणे सोपे समजतात. अशा स्थितीमध्ये पुरुषांचे मानसिक आरोग्य हे जागतिक विषय बनला आहे, ज्यामध्ये पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत गैरसमज आणि सत्य यावर चर्चा होत आहे. असेच काही गैरसमज जे समाजाने पुरुषांवर लादले आहे त्याबाबत सांगणार आहोत.

Mental Health Men
लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज, जोडादाराची Abilty टेस्ट गरजेची
Mental Health Men
Mental Health Men

पुरुषांच्या मानसिक आरोग्याबाबत काही गैरसमज आणि सत्य

१. पुरूष कधीही रडत नाही

लहानपणापासून पुरुषांना शिकवले जाते की, मुल कधी रडत नाही, मुली रडतात. पण सत्य वेगळे आहे. रडणे ही एक मानसिक क्रिया आहे जी तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. पण जेव्हा व्यक्ती रडतो तेव्हा नेचरच्या विरुद्ध जाऊन तणाव असूनही स्वत:ला मजबूत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात पण खरं तर ते आतल्या आत एक दबाव मेहसूस करतात आणि नेहमी बेचैन राहतात. अशावेळी गरजेचे असते की आपल्या भावना कुठेतरी शेअर केल्या पाहिजे आणि मेडिटेशनचा आधार घेतला पाहिजे.

२. पुरुष भावनिक नसतात.

प्रत्येत व्यक्तींप्रमाणे पुरुष भावनिक होऊ शकतात. पण हे कोणत्याही कमतरतेचे लक्षण नाही. सालकॉलॉजिस्ट आणि डॉक्टर्स पुरुष इमोशल होणे पूर्णपणे सामान्य स्थिती असल्याचे सांगतात. अशामध्ये पुरुषांना हक्क असतो की ते आपल्या भावना व्यक्त करु शकतात आणि प्रत्येक भावना व्यक्त करू शकतात.

Mental Health Men
लव बाईटमुळे प्रेमच नव्हे, आरोग्याच्या समस्याही वाढतात, 'अशी' घ्या काळजी
Mental Health Men
Mental Health Men

३. मानसिक आधाराची गरज नसते.

लोकांची साधारण धारणा असते की पुरुषांना मानसिक आधाराती गरज नसते पण असे नाही. पुरुषांनाही मानसिक आधाराची गरज नसते. असे केल्यामुळे स्वत:ला एकटे समजत नाही आणि चांगल्या पध्दतीने जगू शकतात.

Mental Health Men
Mental Health Men

४. पुरूष खूप राग येतो

राग येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. जर मानसिक दृष्ट्या त्रस्त आहाच आणि तुम्हा तुमचे मत मांडू शकत नाही आणि मानिसकरित्या थकलेले आहात तर कोणत्याही व्यक्तीला राग येतो. मग तो पुरूष असो की महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com