Mental Health Tips : मुलांनो बोर्ड एक्झामवेळी आजारांपासून लांब राहायचे असेल तर वेळीच करा ही 5 कामे

मुलांनो ऐन परीक्षेच्या वेळी तुमच्यासोबत असे घडू नये यासाठी तुम्ही वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे
Mental Health Tips
Mental Health Tipsesakal

Mental Health Tips : बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांना अभ्यास करण्याचं टेंशन असतंच. अभ्यास वेळेपर्यंत झाला नसला की मुले रात्र रात्र जागून अभ्यास करतात. अशात तुम्हाला आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास तुमच्या परीक्षेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा मुलांनो ऐन परीक्षेच्या वेळी तुमच्यासोबत असे घडू नये यासाठी तुम्ही वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या काळात मुलांचे मानसिक स्वास्थ्य बरोबर राहण्यासाठी काही उपाय योजले पाहिजेत. ज्यांच्याबद्दल मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सामंत दर्शी यांनी माहिती दिली आहे. या टिप्सच्या मदतीने परीक्षेदरम्यान भीती, चिंता, अस्वस्थता, तणाव किंवा नैराश्य टाळता येऊ शकते. ज्याचा बराच काळ त्रास होऊ शकतो. चिंतेमुळे हात-पाय थरथरणे किंवा जास्त घाम येणे यासारख्या समस्या सुरू होतात.

घोकंपट्टी करु नका (पाठ करणे)

डॉ. सामंत दर्शी यांनी सांगितले की, अभ्यासक्रमची घोकंपट्टी करण्याचा प्रयत्न करणे कधीही चांगली नसते. यासाठी रात्रभर जागून राहिल्याने मन थकते आणि त्यामुळे चिंता वाढू शकते. 9-10 तास पुरेशी झोप घेतल्याने परीक्षेदरम्यान ताजेतवाने आणि अधिक उत्साही वाटण्यास मदत होते.

पेपर सोडवण्याआधी हेल्दी नाश्ता करुन जा

परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या घाईत नाश्ता चुकवू नका. निरोगी न्याहारी केल्याने तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला भूक लागणार नाही. परीक्षेच्या मध्यभागी भूक लागल्याने मन भरकटते आणि गतिशीलता कमी होते. त्याचबरोबर गोड पदार्थांऐवजी फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खा. (Mental Health)

Mental Health Tips
Board Exam : दहावी बारावी परीक्षेत परिक्षा सुरू झाल्यावरच पेपर; निर्णयात बदल

रिव्हीजनचा टाईम टेबल बनवा

परीक्षेपूर्वी एक खास रिव्हीजन वेळापत्रक तयार करा. जेणेकरून परीक्षा आल्यावर काही चुकण्याची भीती नाही. कठीण विषयांवर अधिक लक्ष द्या आणि कठोर परिश्रम करा. असे केल्याने तुम्ही कोणत्याही पेपरची चांगली तयारी कराल. (Board Exams)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com